Tarun Bharat

चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. हरीश शहा यांचे भाऊ विनोद शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून ते कॅन्सर या आजाराने त्रस्त होते.

 
हरीश शहा यांचे बॉलीवुड मध्ये मोठे नाव होते. त्यांनी काला सोना, मेरे जीवन साथी, राम तेरे कितने नाम, धन-दौलत, जलजला, जाल द ट्रॅप यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली होती.  मागील चाळीस वर्ष ते चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. 


तसेच त्यांनी कॅन्सरवर आधारित ‘व्हाय मी’ या  शॉर्टफिल्मची निर्मिती देखील केली होती. त्यांनी 1972 मध्ये हाथी मेरे साथी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी मुख्य भूमिका निभावली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्र, ऋषी कपूर, मिथुन चक्रवती यांच्यासोबत देखील अनेक चित्रपटाची निर्मिती केली होती. 

Related Stories

‘टिप्स’ मारणार मराठी गाण्यांचे शतक

tarunbharat

मुलांच्या आनंदासाठी लाकडाचा टँक

Amit Kulkarni

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू

Abhijeet Shinde

सुखाच्या घरात रंगला माफीचा एपिसोड

Patil_p

‘आब्रा-का-डाब्रा’ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पाडणार भुरळ!

Patil_p

जानेवारीत विवाहबद्ध होणार मौनी रॉय

Patil_p
error: Content is protected !!