Tarun Bharat

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसलेच

कोल्हापुरात झालेल्या बैठकीचा इतिवृतांत 7 विरूध्द 6 मतांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नामंजूर

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापुरात झालेल्या बैठकीतील अविश्वास ठरावाचे इतिवृत्तांतच 7 विरूध्द 6 मतांनी नामंजूर करण्यात आला. त्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसलेच राहतील असा ठराव बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे राजेभोसले यांना न्यायासाठी न्यायालयात जाण्याची गरज भासली नाही. प्रभारी अध्यक्ष धनाजी यमकर यांनी अध्यक्षपदाची सुत्रे राजेभासले यांच्याकडे सोपवली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 26 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत रणजित जाधव यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडून अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. हा ठराव  विषय पत्रिकेवरचा नसल्याने मी राजीनामा देणार नाही अशी भुमिका अध्यक्षांनी घेतली.   तरीही अध्यक्षांच्या विरोधात 14 पैकी 8 विरुद्ध 4 मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. त्यानंतर 13 दिवसांनी बुधवारी मुंबईत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार किंवा दिग्दर्शक सतीश रणदिवे यांची निवड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. तसेच आतापर्यंत महिला अध्यक्ष झालेल्या नाहीत त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपद वर्षा उसगावकर यांना द्यावे, असा विचारही पुढे आला होता. परंतू मुंबईतील बैठकीत सुशांत शेलार आणि निकिता मोघे यांनी अचानक मेघराज राजेभासले यांना पाठींबा दिला. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या राजकारणात अचानक बदल होवून, पुन्हा मेघराज राजेभोसले अध्यक्षपदी विराजमान झाले. शेलार आणि मोघे यांनी अचानक बदलेला निर्णय चित्रपट महामंडळात चर्चेचा विषय बनला आहे.

पंधरा दिवसापुर्वी एकमेकांच्या विरोधा असलेले अचानक एकत्र झाले आणि चित्रपट महामंडळातील राजकारणाला वेगळाच रंग आला. एकंदरीत महामंडळाच्या राजकारणातील डावपेचाने राजकारण्यांनाही मागे टाकले आहे. चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांच्या विरोधात केलेला कट फसल्याने विरोधकांनी राजेभासले यांची माफी मागितली. त्यामुळे उर्वरीत कालावधीत राजेभासलेच अध्यक्षपदी असतील यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, सुशांत शेलार, शरद चव्हाण, , संजय ठुबे, रविंद्र गावडे, रत्नकांत जगताप, वर्षा ऊसगावकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, सतीश बिडकर, बाळ जाधव, उपस्थित होते.

सर्वांना बरोबर घेवून जावू

मला अध्यक्षपदावरून बाजूला करण्यासाठी कायद्याला ढाब्यावर ठेवत अविश्वास ठराव कोल्हापुरच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतू मुंबईतील बैठकीत कोल्हापुरातील बैठकीचा इतिवृत्तांत नामंजूर केल्याने आपोआपच पुन्हा अध्यक्षपद माझ्याकडे आले. त्यामुळे मला कोर्टात जाण्याची गरज भासली नाही. आता संचालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास जपत येथून पुढे सर्वांना बरोबर घेवून जाणार. मदतीचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर संचालकांनी मला माफ करावे. –मेघराज राजेभासले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)

Related Stories

फुटबॉलपटूसाठी ऑनलाईन Kolhapur Juggling Competition स्पर्धेचे आयोजन

Archana Banage

वारणा सहकार समूहास डॉ. डी. वाय.पाटील यांची भेट

Abhijeet Khandekar

पाटगांव परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

Archana Banage

स्थगिती आदेशाला मंगळवारपर्यंत आव्हान

Archana Banage

काळा दिवस पाळून केंद्र शासनाचा निषेध

Archana Banage

कोल्हापुरातील रामाचा पार सार्वजनिक व्यासपीठ, भरायच्या जंगी सभा

Archana Banage