Tarun Bharat

चित्रा वाघ यांच्या सभेत दगडफेक ; घटनेला पोलिसांचा दुजोरा, पण…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी चित्राताई वाघ (Chitra wagh) कोल्हापुरात आहेत. रविवारी संध्याकाळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुक्त सैनिक वसाहत येथे भाजप उमेदवार सत्यजित कदम (satyajit kadam) यांच्यासाठी प्रचारसभा सुरु असताना दगडफेक झाली, असा दावा स्वतः चित्रा वाघ आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. आज कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतानाही माहिती दिली. यांनतर वाघ यांनी थेट जिल्हा पोलीस कार्यालय गाठत जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे (SP Shailesh Balkawade) यांच्याकडे दगड फेकीविरोधात तक्रार दाखल करत या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांकडे तक्रार दाखल केल्यांनतर जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांनी रविवारी रात्री चित्रा वाघ यांच्या सभेवेळी दगडफेक झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी रात्रीपासूनच पोलीस झालेल्या घटनेचा तपास करत असल्याचीही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी चित्रा वाघ यांची मुक्त सैनिक वसाहत येथे रविवारी संध्याकाळी सभा सुरू असताना स्टेजच्या मागून दोन लोक आल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली. तसेच या घटनेच्या माग कोण आहे, त्याचा दगडफेक करण्याचा उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेतील असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

हिमाचल प्रदेश : क्वारंटाइन केंद्र आणि आंतरराज्यीय सीमांवर आता शिक्षकांची नियुक्ती 

Tousif Mujawar

कोल्हापूर : यंदा पहिली उचल एफआरपी अधिक दोनशे

Archana Banage

सांगलीच्या जतमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता ४.५ रिश्टर स्केल

Rahul Gadkar

कोरोनाच्या ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरिएंटचा शोध

datta jadhav

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,430 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

बंगालच्या निवडणुकीत राहुल यांची ‘एंट्री’

Patil_p