Tarun Bharat

चित्रिकरणासाठी राणी मुखर्जी नॉर्वेमध्ये

Advertisements

अभिनेत्री राणी मुखर्जी स्वतःच्या बहुप्रतीक्षित ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचे चित्रिकरणासाठी भारतातून रवाना झाली आहे. एका पूर्ण देशाच्या विरोधात एका आईचा लढा दर्शविणारा हा चित्रपट असणार आहे. ‘मेरे डॅड की मारुति’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बर यांचे या चित्रपटाला दिग्दर्शन लाभले आहे. राणी मुखर्जी नॉर्वेमध्ये महिनाभर चालणाऱया चित्रिकरणात सामील होणार आहे. निखिल अडवाणी आणि झी स्टुडिओजकडून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

मिसेज चटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट तेथील सर्व मातांना समर्पित करणारा आहे. बऱयाच दिवसांपासून वाचलेल्या सर्वात आश्चर्यकारक घटनेवर आधारित हा चित्रपट असल्यामुळे मी लगेच या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे राणीने म्हटले आहे.

2019 मध्ये प्रदर्शित ‘मर्दानी 2’नंतर राणी मुखर्जीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. राणी मुखर्जी सध्या ‘बंटी और बबली 230 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहे. तिच्या या चित्रपटाचे प्रदर्शन कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडले आहे.

Related Stories

कंगना करणार 20 किलो वजन कमी

tarunbharat

41 हजार फुटांच्या उंचीवर विमानात विवाह

Amit Kulkarni

मांजराने रोखली भरधाव रेल्वे

Amit Kulkarni

ऍमी जॅक्सनचा झाला बेकअप

Patil_p

‘पुष्पा’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

‘टकाटक’च्या यशानंतर… आता येणार टकाटक 2

Patil_p
error: Content is protected !!