Tarun Bharat

चित्र स्पष्ट, लढती निश्चित

Advertisements

ग्रा. पं. साठी आजपासून प्रचार : निपाणी तालुक्यात 1228 उमेदवार रिंगणात

वार्ताहर/ निपाणी

संपूर्ण ग्रामीण भागाचे लक्ष लागून राहिलेल्या ग्राम पंचायत निवडणुका 27 रोजी होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शनिवारी माघार प्रक्रिया पूर्ण   होताना रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक अधिकाऱयांनी चिन्हांचेही वाटप केले. ही प्रक्रिया पूर्ण होताच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताना लढतीही निश्चित झाल्या. यामुळे रविवारपासून प्रचाररंग वाढणार आहे.

निपाणी तालुक्यात एकूण 27 ग्राम पंचायती आहेत. यामध्ये 180 प्रभाग असून 487 जागांसाठी निवडणूक लागली होती. यातील बेनाडी 3 तर कोगनोळी 1 अशा फक्त 4 जागांसाठी बिनविरोध निवड झाली असून, आता 483 जागांसाठी लढत होणार आहे. याकरिता छाननीनंतर 1757 अर्ज शिल्लक राहिले होते. शनिवारी माघारीच्या वेळेत 476 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने 1228 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

निपाणी तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायतीसाठी इर्षेने निवडणूक होणार आहे. हे अर्ज दाखल प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस व भाजपात थेट लढत होणार आहे. पण काही ठिकाणी तिसरी आघाडी व अपक्ष उमेदवारांनीही आव्हान निर्माण केले आहे. यामुळे चुरशीने मतदान होणार आहे. पण त्याचबरोबर मतदारांना आपलंस करण्यासाठी प्रचाराच्या धुरळय़ात विविध आमिषे दाखविण्याचे प्रकार पुढे येणार असे दिसत आहे.

Related Stories

बिम्समध्ये आम्हाला काम द्या

Amit Kulkarni

स्वरमल्हार फौंडेशनतर्फे आज शास्त्रीय गायन

Amit Kulkarni

बेळगुंदी येथे हुतात्म्यांना अभिवादन

Tousif Mujawar

कर्ज मिळवून देण्याचे सांगून फसवणूक

Amit Kulkarni

दिशा फिजिओथेरपीतर्फे जनजागृती शिबिर

Omkar B

शाळा इमारत बांधकाम युद्धपातळीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!