Tarun Bharat

चिनी ऍप प्रतिबंध : देशी ऍप चिंगारीला वाढली पसंती

Advertisements

चिनीला एकटे पाडण्याचा प्रयत्न : चिंगारी 10 भाषांमध्ये उपलब्ध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत व चीन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्यामध्ये तणावाचे वातारण आहे. याच काळात चीनकडून शांतता बैठकीनंतर नरमाईची भूमिका घेतली गेलेली नाही. यामुळेच आता भारत सरकारने चीनच्या आर्थिक व्यवहारांमधील नाडय़ा आवळण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून सोमवारी टिकटॉकसह 59 चिनी ऍपवर प्रतिबंध लावले आहेत. याचाच प्रभाव म्हणून देशातील चिनी ऍपला पसंती देणाऱया ग्राहकांनी टिकटॉकचे भारतीय मॉडेल चिंगारी
ऍपला मोठी पसंती दर्शवली असल्याचे पहावयास मिळाले आहे.

टिकटॉकवर प्रतिबंध लावल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच चिंगारीला लाखो लोकांनी पसंती दर्शवत हे ऍप डाऊनलोड केले आणि प्रत्येक तासाला ऍपवर 20 लाख व्हय़ूज मिळाले आहेत. भारत चीन सीमा संघर्षादरम्यान   भारतीय जवान शहीद झाल्याच्या कारणामुळे भारतीयाच्या भावना चीन विरोधात भडकल्या असल्याचे पहावयास मिळत आहे.

ऍपला बेंगळूर येथील स्थित प्रोगॅमर बिस्वत्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी मागील वर्षात या ऍपची निर्मिती केली आहे, जी आता गुगल प्ले स्टोरव सर्वोच्च स्थानावर आहे. याने टिकटॉकच्या जवळ असणाऱया मित्रों ऍपलाही मागे टाकले आहे.

भारतीयांकडेही आता टिकटॉक प्रमाणेच एक देशी आणि अधिक मनोरंजन देणारे पर्याय उपलब्ध असल्याचा विश्वास नायक यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे

Related Stories

ई-कॉमर्सच्या विरोधात तक्रार करणे होणार सोपे

Amit Kulkarni

डार्क वेब-सायबर क्राईमचे अंडरवर्ल्ड

Patil_p

टाटा स्टील भक्कम नफ्यात

Patil_p

लाइफबॉयच्या मासिक जागतिक उत्पादनात वाढ

Patil_p

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्चाचे प्रमाण वाढले

Patil_p

गुगल पे, कार्ड आधारीत पेमेंटसाठी व्हिसाशी भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!