Tarun Bharat

चिनी कर्जामुळे मेंटेनेग्रो दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर

Advertisements

वृत्तसंस्था / पॉडगोरिया

श्रीलंका, मालदीवनंतर आता आणखीन एक देश चिनी कर्जाच्या सापळय़ात अडकताना दिसून येत आहे. युरोपमधील छोटा देश असलेला मोंटेनेग्रो चीनकडून बेल्ट अँड रोड प्रकल्पासाठी घेण्यात आलेले 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला आहे. हे कर्ज एका विशाल महामार्ग निर्माण करण्यासाठी घेण्यात आले होते, पण आतापर्यंत केवळ काही अंतरापर्यंतच महामार्ग तयार करता आला आहे. तरीही मोंटेनेग्रोला पूर्ण कर्ज परत करावे लागत आहे. हे कर्ज न फेडल्यास मोंटेनेग्रो दिवाळखोर ठरून चीन त्याच्या भूमीवर कब्जा करू शकतो.

हा महामार्ग चीनची सरकारी कंपनी चायना रोड अँड ब्रिज कॉर्पोरेशन तयार करत असून याकरता चिनी कामगार आणले गेले आहेत. या चिनी कंपनीने आतायर्पंत 270 मैल लांबीच्या महामार्गाचा पहिला टप्पा सर्बियाच्या बेलग्रेडपर्यंतच  काम पूर्ण केले आहे. चालू महिन्यातच मोंटेनेग्रोला 1 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा पहिला हप्ता चीनच्या सरकारी बँकेत जमा करायचा आहे, पण हे कर्ज परत करण्याची क्षमता मोंटेनेग्रोत नसल्याचे मानले जात आहे.

भूमीवर कब्जा करण्याचा अधिकार

मोंटेनेग्रोवर सध्या त्याच्या एकूण जीडीपीच्या दुप्पट कर्ज आहे. चीनसोबतच्या करारातील अटीनुसार मोंटेनेग्रोने मुदतीत कर्ज न फेडल्यास चीनला त्याच्या भूमीवर कब्जा करण्याचा अधिकार आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे या पूर्ण कराराशी संबंधित वादावर चीनच्या न्यायालयात सुनावणी करण्यास सहमती मोंटेनेग्रोच्या सरकारने दिली आहे.

करारातील अटी निरर्थक आहेत, देशहिताच्या कुठल्याही दृष्टीकोनात या अटी बसत नाहीत असे उद्गार देशाचे उपपंतप्रधान अब्जोविक यांनी मे महिन्यात काढले होते. चीनकडून तयार होणाऱया या महामार्गाबद्दल युरोपमध्ये चर्चा रंगली आहे. युरोपमध्ये चीनचा प्रभाव आता वाढत चालला असल्याचे म्हटले जात आहे. चीनने बेल्ट अँड रोड प्रकल्पाद्वारे आशिया आणि आफ्रिकेतील गरीब देशांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांना स्वतःच्या जाळय़ात ओढले आहे.

मालदीवची तारेवरील कसरत

चीनकडे विदेशी चलनाचा प्रचंड साठा असून याच्या मदतीने तो जगभरातील देशांना कर्जाचे वाटप करत आहे. यातील बहुतांश देश कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने भूमीवर चीन कब्जा करत आहे. याचे एक मोठे उदाहरण श्रीलंका आहे. कर्ज न फेडू शकलेल्या श्रीलंकचे हंबनटोटा बंदर चीनने 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळविले आहे. तर चिनी कर्ज फेडण्यासाठी मालदीवची तारेवरील कसरत सुरू आहे. अशीच अवस्था जिबूती आणि मंगोलियाची झाली आहे.

Related Stories

युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांना चर्चिल पुरस्कार

Patil_p

नव्या युद्धनौकेवरून चीनने मारली फुशारकी

Patil_p

‘चार्ली हेब्दो’ला दहशतवादी हल्ल्याची धमकी

datta jadhav

‘युएन’मध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Amit Kulkarni

हिंदी महासागरात येऊ शकते त्सुनामी!

Patil_p

पृष्ठभागाला स्पर्श, धोका नाही

Patil_p
error: Content is protected !!