Tarun Bharat

चिनी नियंत्रणातील कंपनीचे रिलायन्सकडून अधिग्रहण

Advertisements

5,792 कोटी रुपयांचा व्यवहार -आरईसी सोलर होल्डिंग्सची खरेदी

वृत्तसंस्था / मुंबई

रिलायन्स समुहातील रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने 5,792 कोटी रुपयांमध्ये आरईसी सोलर होल्डिंग्सचे अधिग्रहण केले आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्ल्यूस्टार (ग्रूप) कंपनी लिमिटेडकडून आरईसी सोलर होल्डिंग्स एएसची 100 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे.

जागतिक स्तरावर फोटोवोल्टिक (पीव्ही) मॅन्युफॅक्चरिंग प्लेयर होण्यासाठी रिलायन्सच्या न्यू एनर्जी व्हिजनसाठी हे अधिग्रहण अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अधिग्रहण रिलायन्स समुहाला 2030 पर्यंत ऊर्जेचे 100 गीगावॅट उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. चालू वर्षापर्यंत भारताचेही लक्ष्य 450 गीगावॅट नुतनीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीचे आहे.

आरईसी एक बहुराष्ट्रीय सौरऊर्जा कंपनी आहे. याची सुरुवात नॉर्वेमधील मुख्यालयातून 1996 मध्ये झाली होती. याचे कार्यकारी मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया-प्रशांतमध्ये याची कार्यालये आहेत. या कंपनीकडे 600 हून अधिक युटिलिटी आणि डिझाइन पेटंट्स असून यातून 446 करता मंजुरी मिळाली आहे. आरईसी विशेषत्वाने संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत करणारी कंपनी आहे. 25 वर्षांच्या अनुभवासोबत ही जगातील आघाडीची सोलर सेल, पॅनेल आणि पॉलिसिलिकॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांपैकी एक आहे.

सौरतंत्रज्ञानाचा वापर

रिलायन्सने जामनगरमध्ये धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्समध्ये स्वतःच्या सिलिकॉन-टू-पीव्ही-पॅनेल गीगाफॅक्ट्रीत आरईसी सोलरच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना आखली आहे. याची सुरुवात वर्षाला 4 गीगावॅटच्या क्षमतेसह होणार आहे. पुढील काळात ही क्षमता वार्षिक 10 गीगावॅटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. आरईसीच्या अधिग्रहणामुळे रिलायन्सला एक तयार जागतिक व्यासपीठ तसेच अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशियात तसेच जागतिक सतरावर प्रमुख नवऊर्जा बाजारपेठेत विस्तार आणि विकास करण्याची संधी मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

चीन : वुहानमधील सर्व शाळा मंगळवारपासून होणार सुरू

datta jadhav

चीनच्या ‘बीआरआय’वर मात करणार जी-7

Patil_p

चीनमधील आगीत 10 जणांचा मृत्यू

Patil_p

हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

datta jadhav

…तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होईल

datta jadhav

श्रीलंकेत विक्रमसिंघे हंगामी राष्ट्रपती

Patil_p
error: Content is protected !!