Tarun Bharat

चिनी वस्तुंची होळी

प्रतिनिधी / बेळगाव :

कामत गल्ली येथील शिवशक्ती महिला मंडळातर्फे  चिनी वस्तुंची होळी करण्यात आली. चिनी वस्तुंचा वापर करु नये म्हणून घरोघरी जाऊन जाऊन प्रचार करण्यात आला. चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असून 1962 सालची पुनर्रावृत्ती केली आहे. यामुळे भारताचे जवान शहीरद जालेले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहुन स्थळ देवस्थान कामत गल्ली या देवालयाच्यासमोर चिनी वस्तुंची होळी करण्यात आली.

यावेळी सुगंधा टपालवाले, रेणुका पाटील, मीना ढेकुळे, अर्चना ढेकुळे, सविता शहापूरकर, नीता गाडेकर, शोभा कडेमनी, शितल चौगुले, आशा ढोंबळे, अनुराधा, संजना सुतार, पार्वती धामणेकर, गंगा ठोकणकर, कोमल शहापूरकर, रेणुका बिडीकर, रेणुका जाधव, सुरेखा शेडगे, ज्योती दरवंदर, वंदना जाधव या भगिनी सहभागी झाल्या होत्या. बहिष्कार बहिष्कार चिनी मालाचा बहिष्कार असे म्हणत चिनी वस्तु वापरणे टाळावे असा संदेश जागृतीच्या माध्यमातून देण्यात आला.

Related Stories

शाळांमध्ये प्रेम होण्याच्या घटना धोकादायक

Amit Kulkarni

काकड आरतीला महिलांची लक्षणीय उपस्थिती

mithun mane

अनगोळ येथील ‘तो’ ट्रान्स्फॉर्मर बदलला : नागरिकांतून समाधान

Amit Kulkarni

वडगाव मंगाई देवीची यात्रा यंदाही रद्द

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हा बॉक्सिंग संघाचे राज्यस्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश

Amit Kulkarni

त्वरित ‘रेलकार’ सुरु करा..

Rohit Salunke
error: Content is protected !!