Tarun Bharat

चिनी वस्तूंवर बंदी हेच त्याच्या दादागिरीला प्रत्युत्तर

Advertisements

दीपक ढवळीकर यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी / फोंडा

लडाखच्या सिमाभागात भारतीय सैनिकावर हल्ला करून चिनने एका अर्थाने भारतावर आक्रमणाचे संदेश दिले आहेत. चिनच्या या दादागिरीला प्रत्युत्तर म्हणून चिनी बनावटींच्या सर्व वस्तूंना भारतीय बाजारपेठेत बंदी घालण्याची मागणी म.गो.पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली आहे.

क्रांती दिनानिमित्त फोंडा येथील क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना म.गो पक्षातर्फे आदरांजली वाहिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी म. गो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर तसेचे मगोचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या माध्यमातून चिनने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. आज भारताविरोधात युद्धाचा संदेश देणाऱया चिनला धडा शिकविण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बंदी व बहिष्कार हाच उपाय आहे. असे दीपक ढवळीकर म्हणाले.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वतःच खबरदारी घ्यावी लागेल. सरकारवर अवलंबून राहता येणार नाही. ग्रीन झोनमध्ये सुरक्षित असलेल्या गोव्यातील लॉकडाऊन उठविण्याची जी कुणाची दुर्बुद्धी सुचली त्यामुळेच गोवा पुन्हा धोक्य़ाच्या छायेत आला आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

फुटीर आमदारांविरोधात मगो पक्ष येत्या दोन दिवसात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूरच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालयात या विषयावर निकाल लागण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास पक्षांतराला कायम चाप बसणार व गोमंतकीय जनतेला न्याय मिळणार असेही दीपक ढवळीकर म्हणाले.

Related Stories

तुये देवी भगवती पंचायतन अध्यक्षपदी चंद्रशेखर तुयेकर

Amit Kulkarni

दहा दशकाची जुनी आणि समृद्ध अशी परंपरा लाभलेली खारेबांध येथील पालयेकर बंधूंची चिञशाळा

Omkar B

मडगावात पाऊसाच्या जोरदार सरी बरसल्या

Omkar B

काणकोणात आढळले 11 कोविड रुग्ण

Amit Kulkarni

कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात कोरोनासंदर्भात जागृती

Patil_p

भाऊसाहेब बांदोडकर स्मृतिपुरस्कार उमेश अच्युत नाईक यांना जाहीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!