Tarun Bharat

चिपळुणातील गुटखा विक्रीवर कारवाई करणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी 

a चिपळूण शहरात कारवाई करण्यात आलेल्या गुटख विक्रेत्याकडून पुन्हा गुटखा विक्री होत असल्याची बातमी तरूण भारतने प्रसिद्ध केली होत़ी याची दखन अन्न व औषण प्रशासनाकडून घेण्यात आली आह़े अशा प्रकारे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱयांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त संजय नारगुडे यांनी दिले आहेत़

   मागील 4 महिन्यांपूर्वी चिपळूण शहरात चालणाऱया अवैध गुटख्याच्या विक्रीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होत़ी यामध्ये  रंगोबा साबळे रोड व सावर्डे बाजारपेठेत पोलिसांनी छापा मारून लाखो रूपयांचा गुटखा साठा जप्त केल़ा तसचे गुटख्याची विक्री करणाऱयांवर गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात आली होत़ी मात्र पोलिसांची कारवाई थंडावताच गुटखा विक्रेत्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत़

    चिंतेची बाब म्हणजे शहरातील शाळा-महाविद्यालयाजवळील अनेक दुकानांत तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री केली बिनधास्तपणे केली जात आह़े शाळा-महाविद्यालयाजवळील दुकानांत नियमानुसार तंबाखू, सिगारेट यासारख्या वस्तू विकण्यास बंदी करण्यात आली आह़े तरीदेखील अशा प्रकारे गुटख्याविक्री होताना दिसून येत आह़े यासंदर्भात जिल्हा अन्न व औषध प्रशासन उपायुक्त संजय नारगुडे यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई करण्याचा इशारा दिला आह़े

Related Stories

जिह्यामध्ये कोरोनाने आणखी 12 मृत्यू

Patil_p

तिलारी रामघाटात कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात

Anuja Kudatarkar

वेंगुर्लेतील रस्ते वाहतुक योग्य करा- शिवसेना

Anuja Kudatarkar

Ratnagiri : चिपळुणात शॉर्टसर्पिटमुळे सदनिकेला भीषण आग; 5 लाख 85 हजार रूपयों नुकसान

Abhijeet Khandekar

रत्नागिरीतील नीरा साखर वाढवतेय

Patil_p

मांगेलीचा युवक गोव्यात अपघातात ठार

NIKHIL_N
error: Content is protected !!