Tarun Bharat

चिपळुणातील तीन तलाव झाले तुडुंब!

Advertisements

चिपळूण

समाधानकारक पावसामुळे शहरातील 3 तलाव तुडुंब झाले आहेत. तलावातील पाणीपातळी वाढल्याने मगरींचा वावर वाढला आहे. तसेच तलावांभोवतीच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून देखभालीअभावी तलावांना झाडा-झुडुपांनी वेढले आहे.

तळय़ाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया चिपळूण शहरात बहुतांशी तळी बुजवली गेली असून आता केवळ तीन तळी शिल्लक आहेत. यामध्ये विरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव व नारायण तलावांचा प्रामुख्याने उल्लेख होता. यातील  नारायण तलावाचे निधीअभावी सुशोभिकरण रखडले गेले आहे, तर विरेश्वर व रामतीर्थ तलावाची देखभालअभावी पडझड झाली आहे. सध्या हे तलाव पावसाचा जोर कायम असल्याने तुडुंब भरले आहेत. मात्र त्यांना झाडा-झडुपांनी वेढले आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे तलावात मगरींचा वावर वाढला असून त्या पाण्याबाहेर येत असल्याने धोका वाढला आहे.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत आठ गावांमध्ये बस सेवा सुरू

Archana Banage

राज्य शासनाकडून पूरग्रस्तांची चेष्टा!

NIKHIL_N

लाखिमपुर येथील घटनेचा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीकडुन निषेध

NIKHIL_N

आंबा व्यवसायातून दोन लाख नेपाळींना रोजगार

NIKHIL_N

रत्नागिरीतील घडामोडींचे सिंधुदुर्गात पडसाद

NIKHIL_N

ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुले पळवण्याचा प्रयत्न फसला

Archana Banage
error: Content is protected !!