Tarun Bharat

चिपळुणातील वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

चिपळूण तालुक्यातील 60 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळै जिह्यातील एकूण मृतांची संख्या 371 इतकी झाली आहे. तर रत्नागिरी जिह्यात शुक्रवारी नव्याने तब्बल 20 रूग्ण आढळून आले आहेत़  यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 318 इतकी झाली आह़े

   जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात तब्बल 670 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 16 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 4 असे एकूण 20 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 9, दापोली 2, खेड 4, चिपळूण 4, लांजा 1 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 10 हजार 318 इतकी झाली आह़े तर शुक्रवारी 19 बरे झालेल्या रूग्णांना जिल्हा रूग्णालयाकडून घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 791 वर पोहोचली आह़े  जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.89 टक्के इतके आह़े  जिह्याचा मृत्यूदर 3.59 इतका आह़े

Related Stories

‘आम्ही गाबित’अभियानाचा मालवणात शुभारंभ

Anuja Kudatarkar

शिक्षकांची कोरोना टेस्ट सुरू

Patil_p

केंद्रीय पथक करणार मंडणगडातील केवळ 2 गावांची नुकसानीची पाहणी

Patil_p

महापुरामुळे नुकसान मोठे, मदत तोकडी!

Patil_p

अनलॉकपेक्षा रत्नागिरी जिल्हय़ात 9 जूनपर्यंत कडक निर्बंध

Patil_p

आरोग्य सेवेकडे नव्हे, तर खरेदीकडे लक्ष!

NIKHIL_N
error: Content is protected !!