Tarun Bharat

चिपळुणातून दुचाकी चोरीस

प्रतिनिधी/ चिपळूण

शहरालगत असलेल्या धामणवणे येथील कपिला पार्प येथून दुचाकी चोरीस गेल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली. यापकरणी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश सुरेश दाते (33, खेर्डी-दातेवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. wwपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाते यांच्या मालकीची 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी 13 नोव्हेंबर रोजी धामणवणे येथे सुरु असेलल्या कपिला पार्प या बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर पार्प करुन ठेवण्यात आली होती. मात्र 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने ती चोरुन नेली.

हा प्रकार दाते यांच्या लक्षात येताच त्यांनी येथील पोलीस स्थानकात तकार दिली आहे. त्यानुसान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दरम्यान, शहर परिसरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. या चोरी पकरणी चौकशीसाठी एका महिलेसह तरुणास खेर्डी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात पूर्ण लॅाकडाऊन?;आज निर्णयाची शक्यता

Archana Banage

िजह्यात एसटी प्रवासी संख्येत होतेय वाढ

Patil_p

बारावीचा निकाल जाहीर

Anuja Kudatarkar

शिंदे, फडणवीस अन् पवारांमध्ये आज ‘डिनर डिप्लोमसी’

datta jadhav

बिबटय़ा कातडी प्रकरणातील आरोपीकडून सांबर शिंगेही जप्त

Patil_p

जिह्यात पाच देशी दारुच्या अड्डय़ावर छापे

Patil_p