Tarun Bharat

चिपळुणात अल्पवयीन तरुणीचे अपहरण

चिपळूण

महाविद्यालयातून घरी येत असताना एका अल्पवयीन तरुणीला जबदरस्तीने दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुणाल मंगेश चिपळूणकर (21, कोल्हेखाजन-चिपळूण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल याने संबंधित तरुणी ही महाविद्यालयातून घरी जात असताना कुणाल याने तिला जबदरस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून भरधाव वेगाने पलायन केले. हा प्रकार या तरुणीच्या मैत्रिणीने पाहिल्यानंतर याची माहिती तरुणीच्या पालकांना दिली. त्यानुसार त्या तरुणीच्या पालकांनी याची माहिती पोलीस स्थानकात दिल्यानंतर कुणाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

Related Stories

जिल्ह्य़ात 200 ‘कोविड केअर सेंटर’ उभारणार

Patil_p

अमेरिकन पुस्तकात कोकणातील तीन लोककथा

NIKHIL_N

डाॅक्टर डे निमित्त रोटरीच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

Anuja Kudatarkar

किल्ला बनवणे स्पर्धेला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद ; स्पर्धेचा निकाल जाहीर

Anuja Kudatarkar

कोकण मार्गावर रेल्वेगाडय़ा धावताहेत विलंबानेच

Patil_p

जिल्हय़ातून व्यापाऱयांचा विरोध..काहींचा पाठिंबा!

Patil_p