Tarun Bharat

चिपळुणात आढळले राक्षसमोडा कातळशिल्प

चिपळूण

सिंधुदुर्ग जिह्यात सापडलेल्या कातळशिल्पाचा वारसा चिपळुणासही लाभला आहे. तालुक्यातील वीर-पिलवली सीमेजनजीक राक्षसमोडा हे कातळशिल्प आढळून आले आहे.

रत्नागिरी, राजापूर, तसेच लांजा या तालुक्यात कातळशिल्पे आढळल्यानंतर हा वारसा चिपळूण तालुक्यासही लाभला आहे. वीर-पिलवली येथील ही कातळशिल्पे स्थानिक लोकांना अनेक वर्षापासून ज्ञात होती. मात्र ते प्रकाशझोतात आली नव्हती. वीर येथील स्थानिक नितेश दुर्गोळी व निसर्गप्रेमी अनंत दुर्गोळी यांनी या कातळशिल्पाना भेट देऊन काही निरीक्षणेही नोंदवली आहेत. या कातळशिल्पाचे व्हिडीओ चित्रिकरण करुन नितेश दुर्गोळ यांनी यू टय़ुबवर त्याचे सादरीकरण केल्यानंतर ती खऱया अर्थाने प्रकाशझोतात आली. विस्तीर्ण स्वरुपात हे कातळशिल्प असून राक्षसमोडा स्वरुपात आहे. या कातळशिल्पाची आख्यायिका असून त्यानुसार देव आणि राक्षस यांच्यात झालेल्या युध्दात देवांनी राक्षसांचा पराभव केला होता. या युध्दाच्या स्मृतिप्रित्यार्थ ही कातळशिल्पे खोदण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत बुधवारी पावसाचा जोर कायम

Archana Banage

आंबोलीत मोठी दुर्घटना टळली

NIKHIL_N

मुंबईच्या शिवशंभू ग्रुपची सामाजिक बांधिलकी

Anuja Kudatarkar

दोडामार्गात रस्त्यांची दुरवस्था

NIKHIL_N

किल्ल्यांचा ऐतिहासिक ठेवा जतन करा!

NIKHIL_N

तो जेलिफिश ‘सायनिया रोझी’

NIKHIL_N