Tarun Bharat

चिपळुणात कोरोनाकाळात बैलगाडी स्पर्धा!

Advertisements

आठजणांविरोधात गुन्हा

चिपळूण

कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करुन तालुक्यातील चिंचघरी-अडरे गावातील सीमेवर गुरुवारी बैलगाडी स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 प्रदीप जगदीश कदम (टेरव-दत्तवाडी), नितेश शिर्के (अडरे), महम्मद खान (वेहेळे), आश्रफ कडवेकर (दळवटणे), अनंत जाधव (निर्व्हाळ), कदम (अडरे), मधुकर सावर्डेकर (कोंढे), ऋतिक दाते (खेर्डी-कातळवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. याबाबतची फिर्याद सुहास सोमा मोहिते (54, टेरव) यांनी दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे जिह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. असे असताना गुरूवारी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजण्याच्या कालावधीत चिंचघरी-अडरे गावातील सीमेवर नियमांचे उल्लंघन करत ग्रामस्थांना एकत्र करुन सर्व नियम धाब्यावर बसवत बैलगाडी स्पर्धा घेण्यात आली. याप्रकरणी आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत.

Related Stories

खेडच्या नगराध्यक्षांकडून घोटाळेच घोटाळे!

Amit Kulkarni

दापोलीत एका आठवडय़ात दोन डॉल्फीनचा मृत्यू

Patil_p

बसच्या धडकेने गंभीर जखमी प्रौढाचे निधन

NIKHIL_N

खेर्डीतील ‘स्वामी समर्थ’ मार्केटिंग कंपनीच्या संचालकाला अटक

Patil_p

वेंगुर्लेतील रेकॉर्ड डान्स आणि नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर

Ganeshprasad Gogate

जिल्हाभर रिमझिम; बळीराजा काळजीत!

Patil_p
error: Content is protected !!