Tarun Bharat

चिपळुणात ‘क्वारंटाईन’ना ‘क्रीडाई’तर्फे अन्नदान

पेढांबेतील ‘मंदार’मध्ये 50जण, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 20 दिवस व्यवस्था

वार्ताहर/ चिपळूण

जिल्हा बंदी मोडून आलेल्या 50जणांना पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. या सर्वाना क्रीडाई-चिपळूण यांनी ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून अन्नदान सुरू केलं आहे.

  पेढांबे येथे 20 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना शासनाकडून  जेवण, नाष्टा, मास्क व इतर सुरक्षा आयुधे पुरवण्याचे ठरवण्यात आले आहे. सरकार आपापल्यापरीने काम करत असताना समाजाचे जबाबदार घटक म्हणून आपणही एक ‘व्यावसायीक संघटना’ असलो तरी या कठीण व आणीबाणीच्या प्रसंगात त्यांच्या मदतीला पुढे आले पाहिजे असा विचार ‘क्रीडाई’ या बिल्डरांच्या संघटनेने केला व तत्काळ उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी संघटनेचे अध्यक्ष जावेद दलवाई व सचिव राजेश वाजे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत झालेल्या बैठकीत स्थानिक गरजा लक्षात घेऊन ‘क्वारंटाईन’ केलेल्यांची जबाबदारी उचलावी असे आवाहन केले असताना क्रीडाईने त्यांना प्रतिसाद दिला.

  बांधकाम व्यवसाय हा सध्या मंदीच्या गर्तेत असून फार मोठय़ा अडचणींतून जात आहे. अशातच हे ‘कोरोना’चे संकट उभे ठाकल्याने व्यवसाय व व्यवहार ठप्प झाले आहेत. साईटवरच्या कामगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसायातील अडचणी या येतच असतात, परंतु अशा नैसर्गीक आपत्तीमध्ये आपण समाजाचे घटक असल्याने सामाजिक जबाबदारी उचलावी असे सर्व सदस्यांनी सुचवले. मुख्यत: मोठय़ा संख्येने असलेल्या परप्रांतीय मजुरांना काम बंद असताना रेशन व सुरक्षा साहित्याची उपलब्धता करून देण्याचे काम बिल्डर्स बंधुंनी केले आहे. यापुढेही अशाप्रकारची मदत करण्याची तयारी असल्याचे संघटनेचे खजिनदार  शकील चौगुले, सदस्य विनय काळी, शामकांत कदम, इक्बाल अरकाटे, मन्सूर देसाई, प्रविण पटेल, समीर मेमन, राहुल काळी, प्रसाद खातू आदी सदस्यांनी सांगितले.

Related Stories

पतीने केला धारदार शस्त्राने पत्नीवर वार

Archana Banage

कंपनीचे आठ लाख हडप केलेल्या तरुणास वर्षभरानंतर अटक

Patil_p

रत्नागिरीसह खेड, चिपळूण, दापोली नगर परिषद हद्द वाढवणार

Patil_p

वायरी येथे रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : निमखाऱ्या पाण्यामध्ये शेती शक्य!

Patil_p

दोडामार्गातील युवाईला राणेंकडून मोठे अपेक्षा

NIKHIL_N