Tarun Bharat

चिपळुणात तापाच्या साथीने रूग्णालये हाऊसफुल्ल

Advertisements

खासगी, शासकीय दवाखान्यांमध्ये रूग्ण वाढले, दिवसाला शेकडोजण घेताहेत उपचार, थंडी वाढल्याचा परिणाम

प्रतिनिधी/ चिपळूण

गेल्या काही दिवसांपासून थंडीने कहर केल्याने चिपळूण शहरासह तालुक्यात ताप, सर्दी, खोकल्याची साथ आली आहे. त्यामुळे खासगी व शासकीय दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. दिवसाला शेकडो रूग्णांवर उपचार होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने सध्या ताप, सर्दी, खोकल्याने डोकेवर काढले असून शहरासह तालुक्यात त्याची साथ पसरली आहे. असे असताना दुसरीकडे कोरोनाचे संकटही आले आहे. त्याची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे कोरोना झालाय की साधा आजार आहे अशी भीती सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. मात्र कोरोना झाल्यास अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने कोणीही ऍन्टीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून न घेता खासगी हॉक्टारांकडे जाऊन साध्या आजारावरचे उपचार घेण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे साध्या औषधांनी बरे होत असल्याने तो अनेकांना दिलासा मिळत आहे.

शासकीय दवाखान्यांमध्ये कोरोना चाचणी होईल या भीतीने अनेकजण खासगी दवाखान्यांना अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे शहरातील काही दवाखान्यामध्ये दिवसाला 80 ते 100 रूग्ण तपासले जात आहेत. हे सर्व रूग्ण साध्या औषधांनी बरे होत असल्याने सध्या कोरोनापेक्षा साथीचे आजारच अधिक असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे.

नागरिकांनी घाबरू नये

आजार कशाने आला हे तितकेसे महत्वाचे नसून काही दिवसांच्या मुदतीत औषधांनी फरक न पडल्यास न घाबरत कोरोनाच्या तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही रोगाचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी आजाराला घाबरून जाऊ नये.

डॉ. ज्योती यादव

तालुका आरोग्य अधिकारी चिपळूण

कोरोना रूग्णसंख्या पुन्हा 200 पार

रत्नागिरी सलग दुसऱया दिवशी जिह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 200 हून अधिक झाली आह़े बुधवारी कोरोनाचे 281 नवे रुग्ण सापडले आहेत़ त्यामुळे कोरोनाबाधितांचा  एकूण आकडा 80 हजार 357 इतका झाला आह़े बुधवारी 77 जणांनी कोरोनावर मात केली आह़े त्यामुळे बरे झालेल्याची संख्या 77 हजार 19 इतकी झाली आह़े बुधवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही त्यामुळे मृतांचा आकडा 2 हजार 492 वर थबकला आह़े

    आरटीपीआर चाचणीमध्ये मंडणगड 2, दापोली 20, खेड 21, गुहागर 22, चिपळूण 32, संगमेश्वर 4, रत्नागिरी 23, लांजा 9, राजापूर 1 असे एकूण 134 रुग्ण सापडल़े तर रॅपिड अँन्टीजन चाचणीमध्ये मंडणगड 2, दापोली 4, खेड 21, गुहागर 14, चिपळूण 50, संगमेश्वर 13, रत्नागिरी 33, लांजा 1 व राजापूर 9 असे एकूण 147 रुग्ण सापडल़े जिह्यामध्ये गृहविलगीकरणामध्ये 629 तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये 172 रुग्ण उपचार घेत आहेत़

Related Stories

ग्लोबल रक्तदाताच्या ४थ्या वर्धापनदिनानिमित्त ग्लोबल परिवारातर्फे रक्तपेढीला साहित्य भेट

Ganeshprasad Gogate

ओमिक्रॉनमुळे बेल्जियममध्ये निर्बंधांना विरोध करताना हिंसाचार

Abhijeet Khandekar

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याचा ‘जागतिक वारसा नामांकन’ प्रस्ताव तत्वत: मान्य

NIKHIL_N

बिहारच्या लपवा-छपवीने मृत्यूसंख्येचा विस्फोट

Amit Kulkarni

ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

Amit Kulkarni

गाळ उपशातील डिझेल चोरांवर तत्काळ गुन्हे दाखल करा!

Patil_p
error: Content is protected !!