Tarun Bharat

चिपळुणात पुन्हा लॉकडाऊन अशक्य

प्रतिनिधी/ चिपळूण

शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची तयारी संघटनांनी केली आहे. मात्र त्यास बहुतांशी व्यापाऱयांचा विरोध असल्याने ते शक्य नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन व तपासणीला विरोध करणारे व्यापारी ‘कोरोना झाल्यावर बघू’ अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

  मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्यावर काही महिने शासनाने लॉकडाऊन ठेवले होते. यात अनेक सण आल्याने व्यापाऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे मध्यंतरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला सर्वप्रथम चिपळुणातील व्यापाऱयांकडून विरोध झाला. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्हाधिकाऱयांना येथे सूट द्यावी लागली. त्याचा उलट परिणाम येथे झाला. प्रांताधिकाऱयांनी बाजारपेठ सुरू करताना घातलेल्या सर्व अटी आम्हाला मान्य आहेत, असे सांगणाऱया व्यापाऱयांना त्याचा विसर पडला आणि दुकानात एकावेळी किती ग्राहकांना घ्यावे, सॅनिटायझर, सायंकाळी दुकाने बंद करण्याची वेळ असे अनेक नियम त्यांनी धाब्यावर बसवले. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवापूर्वी व नंतर काही दिवस बाजारपेठेत दरवर्षीसारखा गर्दीचा विक्रम झाला. त्याची फळे आता भोगावी लागत असून मध्यंतरी कोरोनाबाधितांची घटलेली संख्या आता झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचे तत्काळ निदान होऊन रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत, संसर्ग टाळता यावा, यासाठी जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य विभाग, नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पवनतलाव मैदान परिसरात अँटीजेन चाचणीचे दोन कक्ष, मोबाईल व्हॅन अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

  तरीही आम्हाला कोठे कोरोना झालाय, असे म्हणत काही व्यापारी ही चाचणी करून घेण्यास विरोध करीत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता व्यापारी स्वत:हून काही दिवस बाजारपेठ बंद ठेवतील, असे वाटत होते. यासाठी संघटनाही अनुकूल आहेत. मात्र आधीच नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन कशाला, असा प्रश्न अनेक व्यापारी उपस्थित करीत असून त्यांचा या लॉकडाऊनला विरोध आहे. त्यामुळे या साऱया प्रकारामुळे व्यापाऱयांकडून स्वत:हून लॉकडाऊन होणे कठीण असल्याचे दिसत आहे….

Related Stories

व्यापाऱयांशी चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेणार

Patil_p

सात नगरसेवकांचा भाजपला रामराम

NIKHIL_N

ऐन गणेशोत्सवात चोरटय़ांचा धुमाकूळ

Patil_p

जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या 40 हजाराच्या पार

Patil_p

पहिल्यांदाच चुकणार मे महिन्याची कोकणवारी ….!

Patil_p

आज साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण

NIKHIL_N