Tarun Bharat

चिपळुणात शिक्षिका-फार्मासिस्ट पतीला कोरोना

Advertisements

प्रतिनिधी/ चिपळूण

चिपळुण शहरातील गुहागरनाका येथे राहणाऱया शिक्षिकेसह तिच्या फार्मासिस्ट पतीला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी सायंकाळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी उपचार घेतलेले खासगी रूग्णालय सील करण्यात आले असून डॉक्टर, कर्मचारी, शाळेतील सहकारी व कर्मचाऱयांचे नमुने घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

  या दोन नव्या रूग्णामुळे तालुक्याचा आकडा 83 वर गेला आहे. आतापर्यंत यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 73 जण बरे होऊन घरी परतले आहेत. नवे रूग्ण शहरातील गुहागरनाका येथील शबनम संकुलात राहणारे आहेत. यातील  इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षिका असून तिचा पती फार्मासिस्ट आहे. 17 जून रोजी या दोघांनाही ताप येत असल्याने पतीच्या औषध दुकानाशेजारील रूग्णालयात उपचार घेतले. तरीही आराम न पडल्याने एका मोठय़ा रूग्णालयात स्कॅनिंग करून घेतले. त्यानंतर पुर्वीच्याच रूग्णालयात दाखल झाले. तरीही बरे वाटल्याने 24 जूनला खासगी वाहनाने कामथे रूग्णालयात जाऊन नमुने दिले व थेट जिल्हा रूग्णालय गाठले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरूवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

  ही माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसिलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी उपचार घेतलेले रूग्णालय व संकुलात जाऊन माहिती घेतली. तसेच रूग्णालय सील करत राहत असलेली इमारत आयसोलेट केली आहे. शहरात सध्या सर्वेक्षण करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले असून आवश्यक त्या भागात फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दोघांच्याही संपर्कात अनेकजण आल्याचे पुढे येत असून त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. निष्पन्न झालेल्या व्यक्तींचे नमुने घेण्यास सुरूवात झाली असून अन्य व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत.

Related Stories

वाडा भराडे शाळेत पोषण आहार वाटपात गोंधळ

Archana Banage

रत्नागिरी : दापोली पंचायत समिती सभापतीपदी हजवानीच रहाणार

Archana Banage

पावसाच्या शक्यतेने मच्छीमार सावध

Patil_p

रेल्वे प्रवासात महिलेच्या पावणेचार लाखाच्या दागिन्यांवर चोरटय़ांचा डल्ला

Patil_p

खवल्या तस्करीमागे चिनी कनेक्शन?

Patil_p

मजुराच्या धाडसाने मांदिवलीचा पाणी पुरवठा सुरळीत

Patil_p
error: Content is protected !!