Tarun Bharat

चिपळुणात 75 हजाराचा ऐवज चोरीस

चिपळूण

ट्रव्हल गाडीने मुंबई ते कुशिवडे प्रवास करतेवेळी रोख रक्कम व दागिन्यांसह  75 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरोधात सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेखर सखाराम डिके (39, कुशिवडे-भागडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिके हे शनिवारी अमेय ट्रव्हल्स गाडीने वाशी-नवी मुंबईवरुन तालुक्यातील कुशिवडे असा प्रवास करीत होते. याचवेळी अज्ञात चोरटय़ाने डिके यांच्यासह त्याचा मित्र महेश गिरी यांच्या बॅगमधून रोख रक्कमेसह व दागिन्यासह 74 हजार 900 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार डिके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Stories

कोकण रेल्वेस्थानक मार्गाची झाली दुरावस्था

Archana Banage

शिक्षक आंतरजिल्हा बदली वेळापत्रक पुढील आठवड्यात?

Archana Banage

जिह्यात होम क्वारंटाईनची संख्या वाढतीच!

tarunbharat

वेरळ घाटात कंटेनर अडकल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी

Archana Banage

जिह्यात चाचण्या घटल्या; 623 नवे रूग्ण

Patil_p

स्कॉलरशिप परीक्षेतही अस्मीचा दबदबा

Anuja Kudatarkar