Tarun Bharat

चिपळूणच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे!

Advertisements

माहेरवाशिण सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण,परशुराम भूमीत जन्मलेल्या गिरीष प्रभुणे यांना पद्मश्री

प्रतिनिधी/ चिपळूण

चिपळूणच्या माहेरवाशिण सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण तर परशुराम भूमित जन्मलेल्या गिरीश प्रभुणे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मशी पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद शासनाने या दोघांचा सन्मान केल्याने चिपळूणच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले गेले आहेत.

शिरळ हे माहेर असलेल्या महाजन यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण कन्याशाळेत तर अकरावीपर्यंतचे शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मुंबईत त्यांचे पुढील शिक्षण झाले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षा बनण्याच्या मान महाजन यांना मिळाला. त्यांना हे पद मिळाले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांसह मैत्रिणी व अख्या कोकणाने आनंद व्यक्त केला होता. लोकमान्य टिळक वाचन मंदिराने त्यांचा ह्रद्य सत्कारही केला होता. आता त्यांना उच्च नागरी सन्मान मिळाल्याने चिपळूणवासियांचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.

गिरीश प्रभुणे यांनाही केंद्र शासनाच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रभुणे हे पूर्वी वडिलांच्या नोकरीनिमित्त पाग येथील मोरूभाऊ जोशी यांच्या चाळीत रहात होते. वडिलांची बदली झाल्याने ते पुणे-चिंचवड येथे गेले. वंचित, शोषित समजासाठी त्यांनी केलेल्या असामान्य कायामुळे त्यांची पद्मश्रीसाठी निवड झाली. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण परशुरामाच्या भूमित झाल्याने त्यांचाही तालुकावासियांना मोठा अभिमान आहे.

माहेर सत्कारासाठी आतूर

सुमित्रा महाजन यांना पुरस्कार मिळाल्याचा मोठा आनंद आहे. याबद्दल त्यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन लोकमान्य टिळक वाचन मंदिर करणार आहे. महाजन यांनी तारीख दिल्यानंतर हा सत्कार होणार असून यासाठी त्यांचे अवघे माहेर आतूर झाले आहे.

Related Stories

कोकणात गणेशोत्सवासाठी ७४ विशेष गाड्या

Nilkanth Sonar

रत्नागिरी : रामपेठ फुणगूस आणि माखजन बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी

Abhijeet Shinde

‘कलकाम’कडून 31 लाखाची फसवणूक

Omkar B

हायवेच्या उंच-सखलपणामुळे अपघाताच्या घटना

NIKHIL_N

संगमेश्वर, चिपळुणात अवकाळीसह कोसळल्या गारा!

Patil_p

दीक्षित गेडाम सर्वाधिक कार्यकाळाचे मानकरी

NIKHIL_N
error: Content is protected !!