Tarun Bharat

चिपळूण नगर परिषद इमारतीवरुन प्रौढाचा आत्महत्येचा प्रयत्न

Advertisements

चिपळूण

शहरातील नगर परिषदेच्या इमारतीच्या दुसऱया मजल्यावरुन एका प्रौढाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता घडली. विशेष म्हणजे यावेळी त्याने त्याच्या दोन मुलांनाही इमारतीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेच्या अधिकाऱयांच्या कर्तव्यदक्षपणामुळे ते तिघेही बचावले.

  महेश नारायण नलावडे (45, दळवटणे-सध्या-खेंड) असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱयाचे नाव आहे. महेश नलावडे याचा काही वर्षापासून कौटुंबिक वाद आहे. त्याला 2 मुलगे असून तो त्यांच्यासमवेत बाजारपेठेत आला होता. याचदरम्यान नगर परिषद कर्मचाऱयांसह सर्वांची नजर चुकवत तो नगर परिषद इमारतीच्या दुसऱया मजल्यावर तिरंगा झेंडय़ाच्या ठिकाणी गेला व तेथून थेट खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याच्या दोन मुलांनाही ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर अभियंता परेश पवार यांच्यासह अन्य अधिकाऱयांनी तत्काळ धाव घेत त्याच्या तावडीतून दोन्ही मुलांना खेचून घेतले. महेश याने उडी मारली. मात्र सुदैवाने तेथून गेलेल्या केबलमध्ये तो अडकला आणि खाली पडला. पालिका कर्मचाऱयांनी ताडपत्री पकडून त्याला वाचवले.

या प्रकारामुळे त्याची दोन्ही लहानगी मुले प्रचंड घाबरली होती. या प्रकारामुळे नगर परिषद परिसरात गोंधळ उडाला होता. यावेळी बघ्यांची गर्दी उसळली होती. महेश याच्यासह त्याच्या दोन मुलांना नगर परिषद कर्मचाऱयांनी पोलीस स्थानकात आणले. रात्री उशिरापर्यंत त्याचा जाबजबाब सुरू असल्याने पुढील माहिती मिळू शकलेली नाही.

Related Stories

कोकण रेल्वे विद्युतीकरणाची महिनाभरात चाचणी

Patil_p

राज्याप्रमाणेच जिल्हय़ातही होणार तीन झोन

Patil_p

जिल्हाधिकारीच घेणार शाळांचा निर्णय

NIKHIL_N

उजव्या-डाव्या बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवणार!

NIKHIL_N

अग्निशामक केंद्रासह पालिकेची इमारत

NIKHIL_N

लवकरच देशव्यापी चक्काजाम आंदोलन!

NIKHIL_N
error: Content is protected !!