Tarun Bharat

चिमुकल्या हर्षालीने पार केले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर

Advertisements

सरवडे / विजय पाटील

छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकोट म्हणजे एक जिवंत प्रेरणास्त्रोत आहेत. यापैकी अनेक गडकिल्ले पायी फिरून पाहणे मोठ्या अनेकांना शक्य होत नाही. परंतु काही गडकोट व महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई पायी सर करण्याचे स्फुर्तीदायी काम एका चिमुकलीने केले आहे. या चिमुकल्या रणरागिनीचे नाव हर्षाली विजय पाटील सध्या राहणार पुणे ( मुळगाव सरवडे ता. राधानगरी )असे आहे. अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या या चिमुकलीचा आदर्श कौतुकास्पद आहे.

ज्या वयात आजची मुले लहान लहान खेळणी, मोबाईलच्या गेम्समध्ये व्यस्त आहेत. त्या वयात हर्षालीने दुर्गम गडकोट व शिखरे पादाक्रांत केली आहेत. ज्या वयात बालकांना घरात नीट चालता येत नाही . अशा वयात हर्षली न थकता गडकोट चढते. ही खरोखरच थक्क करणारी बाब आहे. वडील विजय यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड प्रेम तर गड किल्ले फिरण्याची भारी आवड. यातूनच हर्षालीला गड चढण्याचे बाळकडू मिळत गेले. त्यांच्या प्रयत्नाने तिने वय वर्ष एक असताना शिवजन्मभूमी असणारा शिवनेरी किल्ला ३५०० फूट, वय वर्ष दोन असताना रामशेज किल्ला ३२०० फूट , हरिश्चंद्रगड ४००० फूट तसेच हरिहरगड ३६७६ फूट तर महाराष्टातील सर्वोच्च उंच शिखर कळसुबाई ५४०० फूट हे सर केले आहे.

तिच्या या उपक्रमाने बदललेल्या जीवनशैलीत गुरफटलेल्या बालकांना नवी प्रेरणा व इतिहास प्रेमींना ऊर्जा मिळाली आहे. तिला या धाडसी उपक्रमासाठी वडील विजय बळवंत पाटील, आई सुप्रिया पाटील तसेच ओमकार वागवेकर , रोहित एरूडकर,अजय पाटील, शुभम पोवार व हिंदुराष्ट्र फिरस्ते टीम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

शेतकरी,व्यापारी स्नेहभेटीची अठरा वर्षांची परंपरा कायम

Abhijeet Shinde

राहुल गांधींना रायगड भेटीचे निमंत्रण

Archana Banage

प्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध

Abhijeet Shinde

शिरोळ नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Abhijeet Shinde

दहावी, बारावी सतरा नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Abhijeet Shinde

शूर सरदारांनो खचू नका !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!