Tarun Bharat

चिरडणाऱया पोलिसास निलंबित करा

Advertisements

गोवा फॉरवर्डची मागणी

प्रतिनिधी / पणजी

विद्यमान सरकार लोकांना गृहित धरत असून सागर एकोसकर या उद्दाम पोलीस अधिकाऱयाने वयोवृद्ध महिलेच्या शरीरावर पाय ठेवला असतानाही अद्याप कोणतीही कारवाई होत नाही. खरेतर अशा अधिकाऱयास तत्काळ निलंबित करायला हवी होती, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी व्यक्त केले आहे.

70-80 च्या दशकात आम्हीही अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हे कधीच विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याएवढे निष्ठूर व अहंकारी वृत्तीने वागले नव्हते. सध्याचे सरकार कोणताही निर्णय घेताना लोकहिताचा विचारच करत नाही आणि लोकांचे मतही विचारात घेत नाही, अशी टीका लोलयेकर यांनी केली आहे.

सत्ता डोक्यात भिनली

जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची बोलण्या वागण्याची पद्धतच पूर्णपणे बदलली असून सत्ता डोक्यात भिनली आहे, अशी टीका फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि साबांखा मंत्री पावसकर हे या सरकारची स्तुती करताना हे सरकार बहुजन समाजाचे असल्याचे सांगतात. परंतु प्रत्यक्षात हे सरकार श्रीमंतांचे, माफियांचे आहे, असेही कामत यांनी सांगितले. त्यामुळेच गांजा सारख्या अमलीपदार्थाच्या लागवडीस मान्यता देण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे, असे कामत म्हणाले.

एखाद्या सर्वसामान्य नागरिकास मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्यास त्यांची भेट होऊ शकत नाही, परंतु माफिया व्यवसायात असलेल्या लोकांसांठी मात्र ते लगेच उपलब्ध होतात. धनाडय़ांच्या प्रकल्पांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रसंगी गोरगरीब स्थानिकांवर लाठीमार करून स्वतःची क्रूरता सिद्ध करतात, असा आरोपही कामत यांनी केला आहे.

Related Stories

टॅक्सी व्यावसायिकांसाठी महामंडळ

Amit Kulkarni

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट दाखल

Amit Kulkarni

निवडणूक घोषणा विलंबाचा भाजपला लाभ होण्याचा संशय

Amit Kulkarni

सत्तरीत लईराई देवीच्या धोंडगणांकडून सोवळे व्रताला सुरुवात

Amit Kulkarni

वाढता कोरोना, वाढती चिंता!

Amit Kulkarni

बेंगलोर एफसीच्या ताफ्यात 19 वर्षीय हरमनप्रीत सिंग

Amit Kulkarni
error: Content is protected !!