Tarun Bharat

चिवला समुद्र किनारी रापण नौका दुर्घटनाग्रस्त

जवळपास दीड लाखाची हानी

मालवण:

 चिवला बीच समुद्र किनारी जोरदार लाटांच्या तडाख्यात सापडून महेश हडकर रापण संघाची ‘दर्यासागर’ ही लाकडी नौका आणि जाळय़ांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. अन्य मच्छीमारांच्या साहय़ाने दुर्घटनाग्रस्त नौका किनाऱयावर आणण्यात आली.

 शुक्रवारी महेश हडकर, सुभाष मिठबावकर, झाकी गिरकर, अंतोन मेंडिस, विजय फाटक, अशोक पेडणेकर, कर्नल फर्नांडिस, ईनास मेंडिस, पावलू सोझ, जोसेफ फर्नांडिस, म्हापसेकर आदी दहा ते बारा मच्छीमार रापणीचे जाळे टाकण्यासाठी नौका घेऊन निघाले होते. परंतु अचानक उसळलेल्या मोठय़ा लाटेत नौका दुर्घटनाग्रस्त झाली. सुदैवाने यात मच्छीमारांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र, नौकेला तीन-चार ठिकाणी मोठे तडे गेले. तसेच जाळय़ांचे नुकसान झाले. किनाऱयावरील अन्य मच्छीमारांनी तातडीने समुद्रात धाव घेत नौका किनाऱयावर घेतली. नौका दुरुस्तीसाठी येणारा खर्च आणि नौकेअभावी वाया जाणाऱया मत्स्य हंगामामुळे हडकर रापण संघातील मच्छीमारांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. अशा प्रकारच्या नुकसानीची शासकीय भरपाई देण्याची तरतूद नसल्याने मच्छीमारांनाच स्वत:च्या नौकेची दुरुस्ती करावी लागणार आहे. भविष्यात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून अशा दुर्घटनाग्रस्त मच्छीमारांसाठी तातडीची मदत मंजूर करून घ्यावी, अशी मागणी होत आहे. p

Related Stories

वेंगुर्लेतील पोटनिवडणुकित एकनाथ राऊळ, गणपत सावंत आणि रघुनाथ खानोलकर विजयी

Anuja Kudatarkar

`स्वीस इंडिया’च्या टॅगिंगमुळे `कोकणच्या राजा’ला झळाळी !

Archana Banage

एस.टी. मोफत प्रवासासंदर्भात रत्नागिरीत अद्यापही आदेश नाही

Patil_p

उद्योगपती रतन टाटांकडून पोस्टमनच्या कामाची दखल

NIKHIL_N

परुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित

NIKHIL_N

जिल्हास्तर पिंचाक फाईट स्पर्धेत खेड संघाची 54 पदकांची कमाई

Patil_p