Tarun Bharat

चीनकडून सिनोफार्मच्या लसीला मंजुरी

कोरोना विषाणूच्या विरोधात सिनोफार्म लसीच्या प्रभावोत्पादकतेवर जागितक टीका होत असूनही चीनने गुरुवारी या लसीच्या नागरिकांवरील वापराला मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या वापरासाठी चीनने मंजुरी दिलेली ही पहिली लस आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम विश्लेषणाच्या आधारावर ही लस 79 टक्क्यांहून अधिक प्रभावोत्पादक आढळून आल्याचा दावा बीजिंग इन्स्टीटय़ूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सने केला आहे. फेब्रुवारीमध्ये लूनर नववर्षाच्या सुटीदरम्यान चीनमध्ये 5 कोटी लोकांच्या लसीकरणाची योजना आहे.

सिनोफार्मने परीक्षणाचे निष्कर्ष अद्याप जाहीर केलेले नाहीत. लसीसंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकलेली नाहीत. तसेच चीनच्या लसीबाबतचा संशय अधिकच वाढला आहे. अन्य देशांमध्ये मान्यताप्राप्त लसींच्या तुलनेत ही लस कमी प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉडर्ना आणि फायजर-बायोएनटेकची लस 95 टक्क्यापर्यंत प्रभावी आहे. तर रशियाची लस 91 टक्के प्रभावी आहे.

चिनी लसीसंबंधी संशय

सिनोफार्मच्या लसीला बहारीन आणि संयुक्त अरब अमिरातने वापरासाठी अनुमती दिली आहे. परंतु यापूर्वीही चीनने सिनोवॅककडून निर्मित अन्य लसीबाबत अल्प माहिती दिली होती. चिनी लसींची सुरक्षा आणि प्रभावोत्पादकतेवर विस्तृत माहितीच्या अभावामुळे जगभरात त्याच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचमुळे जगासमोर चीनची विश्वासार्हता जवळपास संपुष्टात आली आहे.

Related Stories

सोसाटय़ांच्या वाऱयांमुळे तुटला काचेचा पूल

Patil_p

13,560 किमीचे पक्ष्याकडून सलग उड्डाण

Patil_p

काश्मीर भारताचा अंतर्गत विषय!

Patil_p

चीनची बायडन यांच्यावर गलिच्छ टीका

Omkar B

एलईटी, जैश अन् पाक सैन्यामुळेच सरशी

Patil_p

अमेरिकेत ट्रकला रेल्वेची धडक

Patil_p