Tarun Bharat

चीनकडून 1.4 लाख कोटींच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची विक्री

2019 मधील आकडेवारीचा समावेश : भारतीय कंपन्यांचा 9 टक्के हिस्सा, चिनी कंपन्यांना लगाम लावला जाणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एका बाजूला भारत आणि चीन यांच्यात सीमेवर संघर्षातून वाद निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंधामध्ये तणाव राहिला आहे. याचा नकारात्मक परिणाम म्हणजे देशात चीनच्या विरोधात क्यापारी धोरण बदलण्यासंदर्भात विचार करण्यात येत असल्याचे वातावरण सध्या निर्माण झाले असले तरी देशातील व्यवसायातील विविध क्षेत्रांमधील चीनचा सहभाग हा सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. 2019 मध्ये चीनने भारताला जवळपास 1.4 लाख कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री केले आहे.

आता सरकार काही चिनी कंपन्यांना लगाम लावण्यासाठी कर आकारणी करण्याची तयारी करत आहे. यामध्ये ज्या कंपन्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे चीन सरकारसोबत आहेत त्यांच्यावर सर्व पातळीवरुन प्रतिबंध लावण्याची योजना आखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाओमी, वीवो, ओप्पो यासारख्या खासगी स्मार्टफोन कंपन्यांवर हा धोका निर्माण होत असल्याचे सध्या तरी पहावयास मिळत नसल्याचे म्हटले आहे.

चीनकडून होणारी आयात

चीनने भारतामध्ये होणारी इलेक्ट्रॉनिक वस्तुंची आयात जास्तीची पहावयास मिळत आहे. यामध्ये 2019 मध्ये चीनकडून जवळपास 1.4 लाख कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स आणि कार्बन यासारख्या ब्रँडचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्मार्टफोन्समध्ये चीनचा 81 टक्के वाटा

स्मार्टफोन बाजारामध्ये चीनचा हिस्सा वाढत आहे. 2018 मध्ये भारतामध्ये स्मार्टफोन्सच्या बाजारात 60 टक्के चिनी कंपन्यांचा कब्जा होता. 2019 मध्ये 71 टक्क्मयांवर पोहोचला. 2020 च्या पहिल्या तिमाहीत हिस्सा वाढून 81 टक्क्मयांवर पोहचला आहे.

भारतीय कंपन्यांची स्थिती

2018 मध्ये स्मार्टफोन बाजारात भारतीय कंपन्यांजवळ फक्त 9 टक्के हिस्सेदारी होती. जी 2019 मध्ये घटून 1.6 टक्के राहिली आहे तर सध्या 2020 च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा आणखीन घटला असून तो जवळपास 1 टक्क्मयांच्या घरात पोहोचला आहे. स्मार्ट टीव्हीच्या बाबत हा आकडा थोडा वेगळा असून या बाजारात काही प्रमाणात आपला वाटा वाढला असल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

खाद्यतेल आयात 6 वर्षांत सर्वात कमी

Patil_p

कोरोना लढाईसाठी विप्रो देणार 1000 कोटी

Patil_p

700 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट

Amit Kulkarni

सलग दुसऱया दिवशीही बाजाराची घसरण

Patil_p

समभागांमध्ये गुंतवणुकीत युवक पुढे

Patil_p

गोदरेजने घेतली हरियाणात जमीन

Patil_p