Tarun Bharat

चीनकडे आहे जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

अमेरिका जगात सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो. मात्र, आज मिलिट्री डायरेक्ट या संरक्षण विषयक वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार चीनकडे जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्य आहे. भक्कम नौदलाच्या जोरावर चीन सैन्यशक्तीत जगात पहिल्या क्रमांकार पोहचला असून, चीन आता कोणत्याही देशाला आव्हान देऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी या देशांनी केलेली आर्थिक तरतूद, सैन्‍यदलातील मनुष्‍यबळ, अणुशक्‍ती संसाधने, पायदळासह हवाई आणि नौदलाचे सक्षमीकरण, अधिकारी-जवानांचे वेतन आणि शस्‍त्रसाठा याच्या आधारे या वेबसाईटने संबंधित देशांना 100 पैकी गुण दिले.

त्यामध्ये 82 गुण मिळवत चीन जगातील सर्वात शक्‍तीशाली सैन्‍यदल ठरले आहे. अमेरिकेचे सैन्य बजेट मोठे असले तरी तो 74 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 69 गुणांसह रशिया तिसऱ्या तर भारत या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून, भारताला 61 गुण मिळाले आहेत. 58 गुणांसह फ्रान्स पाचव्या स्थानावर आहे.

Related Stories

आयर्लंडचे पंतप्रधान रुग्ण सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात

prashant_c

तोंडी औषधाचा परिणाम 24 तासांमध्ये

Patil_p

पुढील महिन्यात पाकिस्तानात परतणार नवाज शरीफ

Amit Kulkarni

अमेरिकेत नव्या नशेची महामारी

Patil_p

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध

Patil_p

कोरोनाला पूर्ण नष्ट करतो मॉलीक्यूल ‘एबी 8’

Patil_p