Tarun Bharat

चीनची निर्यात 30 टक्क्यांनी वाढली

वृत्तसंस्था/ बीजिंग

जागतिक पातळीवरील मागणीमध्ये झालेल्या वाढीच्या परिणामामुळे मार्च महिन्यात चीनची निर्यात ही वर्षाच्या आधारे 30.6 टक्क्यांनी वाढली असल्याचे समोर आले आहे. यादरम्यानच्या काळात व्यापारातील तेजीचे संकेत हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर अवलंबून राहिले आहेत. कारण चीनसोबत शुल्क आकारणीचे युद्ध समाप्त करण्यासाठी चर्चा सुरु करण्याच्या बाजूने काही पावले उचलली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

सीमा शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये चीनची निर्यात वाढीसोबत 241.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. परंतु 2021 च्या अगोदर 2 महिन्यात निर्यातीत 60.6 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाल्याची नोंद केली होती. याचदरम्यान चीनची आयातही 38.1 टक्क्यांनी वाढून 227.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

सकारात्मक संकेत

जागतिक पातळीवर आर्थिक आणि व्यापारातील आलेल्या तेजीच्या वातावरणामुळे आगामी काळातही वाढ राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात असल्याची माहिती अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

औद्योगिक उत्पादन 13 टक्क्यांनी वाढले

Patil_p

हळद दुधानंतर आता अमूलचे हळदयुक्त आईस्क्रीम बाजारात

Omkar B

इंडियाबुल्सने 874 कोटींची केली घर विक्री

Patil_p

रिझर्व्ह बँकेचे स्वागतार्ह धोरण

tarunbharat

जेफ बेजोस फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी

Patil_p

टाटा पॉवरच्या नफ्यामध्ये घट

Amit Kulkarni