Tarun Bharat

चीनच्या दहशतवादी कृत्यांमुळे म्यानमार त्रस्त

वृत्तसंस्था / यंगून :

भारत आणि जपानला युद्धाची धमकी देत असलेल्या चीनच्या विरोधात आता म्यानमारने संताप व्यक्त केला आहे. म्यानमारमधील दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रs पुरविणे बंद करा अशी इशारावजा सूचना म्यानमारच्या सैन्यप्रमुखाने चीनला केली आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे. दक्षिणपूर्व आशियात म्यानमार हा चीनचा सर्वात महत्त्वाचा शेजारी मानला जातो.

म्यानमारमध्ये सक्रीय दहशतवादी गटांना मोठय़ा शक्तींचे सहाय्य प्राप्त असल्याचे सैन्यप्रमुख जनरल मिग आंग ह्लाइंग यांनी रशियाच्या शासकीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. जनरल ह्लाइंग यांनी >?ोठी शक्ती’ असा केलेला उल्लेख चीनच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट आहे. 

रोहिंग्या दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा

म्यानमारच्या सशस्त्र दलांच्या कमांडर-इन-चीफकडून करण्यात आलेल्या टिप्पणीवर सैन्यप्रवक्ते ब्रिग्रेडियर जनरल मॉ मिन टुन यांनी विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. अराकान आर्मी (एए) आणि अराकान रोहिंग्या सॉल्वेशन आर्मी (एआरएसए) या दहशतवादी संघटनांचा सैन्यप्रमुखांनी उल्लेख केला आहे. या दोन्ही दहशतवादी संघटना चीनला लागून असलेल्या पश्चिम म्यानमारमध्ये रखाईन प्रांतात सक्रीय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दबावतंत्राचा भाग

म्यानमारने बेल्ट अँड रोड प्रकल्पातील अनेक प्रकल्पांना मंजुरी द्यावी असा चीनचा प्रयत्न आहे. प्रकल्पांना मंजुरी देण्याचा दबाव म्यानमार सरकारवर आणण्यासाठी चीन दहशतवादी संघटनांना शस्त्रपुरवठा करत आहे. तर म्यानमारने बेल्ट अँड रोड प्रकल्पात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याचबरोबर चीन आता पाकिस्तानी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी चिथावणी देत आहे.

क्षेपणास्त्र पुरविली

अराकान आर्मीमागे शेजारी देशाचा हात आहे. 2019 पासून या दहशतवादी संघटनेने चीननिर्मित शस्त्रास्त्रs आणि भुसुरुंगांचा वापर करत म्यानमार सैन्यावर हल्ले चालविले आहेत. नोव्हेंबर महिन्यात म्यानमार सैन्याने एका कारवाईत प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या तळावरून मोठय़ा संख्येत शस्त्रास्त्रs हस्तगत केली होती. या शस्त्रास्त्रांमध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रही सामील होते.  छाप्यात सापडलेल्या क्षेपणास्त्रांची किंमत 70 ते 90 हजार डॉलर्सच्या आसपास होती आणि ही सर्व शस्त्रास्त्रs मेड इन चायना होती.

Related Stories

कडेकोट बंदोबस्तात जलिकट्टूस प्रारंभ

Patil_p

फारुख अब्दुल्ला कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

दिल्लीत आता नायब राज्यपालांचे सरकार

datta jadhav

अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर सोनू सूद म्हणाला ….

Archana Banage

बिहारमध्ये कलंकित मंत्र्याच्या खात्यात बदल

Patil_p

फटाका कारखान्यात स्फोट, 7 ठार

Patil_p