Tarun Bharat

चीनच्या Helo Lite सह अन्य अ‍ॅप्सवरही भारत घालणार बंदी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत चीनला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्यानंतर मोदी सरकार आता Helo Lite सह चीनच्या अन्य अ‍ॅप्सवर बंदी घालणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी तसेच यूजर्सना असुरक्षित असलेल्या 59 चिनी अ‍ॅप्सवर काही दिवसांपूर्वी भारत सरकारने बंदी घातली. त्यानंतर आता Helo Lite, ShareIt Lite, Bigo Lite and VFY Lite या चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. ही अ‍ॅप्स Google playstore आणि Apple app store वरून देखील हटविण्यात आली आहेत.

भारताच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक अ‍ॅप्सची यादी केंद्र सरकारला दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पुढील माहिती घेत या अ‍ॅप्सवर बंदी आणली. दरम्यान, पूर्व लडाखमधील भारत-चीन हिंसक संघर्षानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Stories

मुख्यमंत्री ठाकरे सोलापुरात दाखल, नुकसानीचा आढावा घेणार

Abhijeet Shinde

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला दणका

Omkar B

10 वर्षापर्यंत प्रभावी राहणार कोरोनाची लस

Patil_p

रेशनिंगच्या वाटपाची जबाबदारी पालकमंत्र्यांची : अजित पवार

prashant_c

दहशतवादी हल्ल्याचा इशारा ; राजधानी दिल्लीत हाय अलर्ट

Abhijeet Shinde

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

prashant_c
error: Content is protected !!