Tarun Bharat

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ भागांची नावं बदलली

ऑनलाईन टीम/तरुण भारत

चीननं पुन्हा एकदा भारताला भडकवण्याचं काम केलंय. चीननं अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावं बदलली असून या ठिकाणांना ‘चिनी’ शब्दांत नाव देण्यात आली आहेत, त्यामुळं भारत-चीन वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार चीनच्या नागरी मंत्रालयानं नियमांनुसार, चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट किंवा जंगनान म्हणत आहे. चायनीज अक्षरांत ही नाव देण्यात आली आहेत. ज्या 15 ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत, ती भारतातील अरुणाचल प्रदेशचा भाग आहे. 15 बदललेल्या नावांपैकी आठ निवासी ठिकाणं, चार पर्वत, दोन नद्या आणि एक पर्वतीय खिंड आहे. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना चिनी नावं देण्याचं काम दुसऱ्यांदा चीननं केलंय. याआधी 2017 मध्ये चीननं सहा ठिकाणांना स्वत:चं नाव दिलं होतं.

Related Stories

रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला शक्य

Patil_p

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे निधन

Tousif Mujawar

देशातील लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवला, केंद्र सरकारचा निर्णय

Tousif Mujawar

राहुल गांधींना मिळाली पूजा भट्टची साथ

Patil_p

फटाके कारखान्यातील स्फोटात 5 कामगार ठार

Amit Kulkarni

शिंदे गटाने घेतले कामाख्या देवीचे दर्शन

Patil_p