Tarun Bharat

चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजार नव्हे तर 6 लाख 40 हजार

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजार नव्हे तर 6 लाख 40 हजार असल्याची माहिती चीनमधील चांगशा सिटीतील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने दिली आहे. 

चीनचा खोटेपणा जगाला ज्ञात असल्याने चीनमधील कोरोनाबधितांच्या आकडेवारीवर अमेरिकेसह अनेक देशांनी यापूर्वीच संशय व्यक्त केला होता. काही देशांनी थेट चीनवर आकडेवारी लपविल्याचे आरोप केले आहेत. मात्र, चीनमधील लष्करी विद्यापीठाचे आकडे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

लष्करी विद्यापीठाच्या माहितीनुसार,  वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाने चीनमधील 230 शहरांमध्ये थैमान घातला आहे. सत्ताधाऱ्यांच्या लपवाछपवीच्या धोरणांमुळे खरी आकडेवारी जगासमोर आली नाही. मात्र, विद्यापीठाकडे चीनमधील प्रत्येक रुग्णाची, रुग्ण दाखल झालेले हॉस्पिटल आणि त्याच्या ठिकाणाची माहिती आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचारात असलेल्या रुग्णांची ही आकडेवारी आहे. चीनमध्ये आतापर्यंत 6 लाख 40 हजार रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी एक पत्रक काढून लष्करी विद्यापीठाच्या आकडेवारीचे खंडन केले आहे.

Related Stories

तडसर येथे दोन नवीन धान्य गोदामे होणार : राज्यमंत्री विश्वजीत कदम

Archana Banage

भास्कर जाधव यांच्या ‘त्या’ कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

Archana Banage

KOLHAPUR;महाराष्ट्राच्या सीमेवर शिवसेनेला खिंडार, चंदगडमधील मोठा गट शिंदे गटात जाण्याच्या तयारीत

Rahul Gadkar

शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार; संजय राऊतांचे संकेत

Archana Banage

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात पूर्ण लॅाकडाऊन?;आज निर्णयाची शक्यता

Archana Banage