Tarun Bharat

चीनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी दाखल

वुहानमधून एअर इंडियाच्या विमानाने 324 जणांना आणले

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

जगभर आरोग्य आणीबाणी जाहीर करायला लावणाऱया कोरोना विषाणूचे मूळ असलेल्या चीनच्या वुहानमधून 324 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. शुक्रवारी यासाठी एअर इंडियाचे एक खास विमान चीनला पाठवण्यात आले होते. शनिवारी सकाळी या प्रवाशांना इंदिरा गांधी विमानतळावर आणण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण खात्री पटल्यानंतरच तेथून ‘डिस्चार्ज’ दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

चीनच्या वुहान प्रांतामध्ये कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे संपूर्ण चीनमध्ये घबराट पसरली आहे. अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना तेथून परत आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भारतानेही वुहानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटेकसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एअर इंडियाचे डबलडेकर विमान मुंबईहून दिल्ली आणि तेथून दुपारी वुहानला रवाना झाले. ते वुहानमधील भारतीयांना घेऊन सकाळी साडेसातच्या सुमारास परतले आहे.

दरम्यान, केरळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने देशभर ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधून आणलेल्या भारतीयांची कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. परत आणलेल्या 324 प्रवाशांमध्ये 3 अल्पवयीन मुले व 211 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना दिल्लीतील भारत तिबेट सीमा पोलिसांच्या छावाला शिबिर आणि हरियाणातील मानेसर येथील सेना शिबिरात 14 दिवस ठेवले जाणार आहे. येथे त्यांच्यावर योग्य उपचार केले जाणार असून पूर्ण खात्री झाल्यावरच त्यांना सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. या 324 पैकी 103 जणांना विमानतळावरील वैद्यकीय निरीक्षण तळावर ठेवण्यात आले आहे. तर चीनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही सहा भारतीय वुहानमध्ये आहेत. परंतु त्यांना ताप भरल्याने विमानातून उतरवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Related Stories

भारतीय वंशाच्या तिघांचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू

Patil_p

महिंदा राजपक्षे यांचा दणदणीत विजय

Patil_p

ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात, चहासाठी चांदीचा टी सेट

tarunbharat

अश्लीलवाणीचा प्रताप, मुफ्तीच्या कानशिलात

Patil_p

पाकिस्तानात सत्तापालट

Patil_p

संतापजनक कृतीमुळे होतो तुरुंगवास

Patil_p