Tarun Bharat

चीनमध्ये १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

ऑनलाईन टीम / तरुण भारत

दैनंदिन वृत्तामध्ये युक्रेन – रशिया यांच्यात युद्धजन्य स्थिती असल्याने या देशात हवाई हल्यात हवाई जहाज अथवा विमानाचा अपघाताचे वृत्त पाहत असतो मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चीनमधील एका विमानाचा अपघात झाला असुन चायना इस्टर्न पॅसेंजर जेट चीनच्या नैऋत्य भागामध्ये ते क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या अपघातात किती मृत्यू झालेले आहेत. याबाबत माहिती मिळाली नसली तरी या विमानातुन 133 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ विमान वुझोउ शहर, गुआंग्शी प्रदेशाजवळील ग्रामीण भागात आग लागल्याने क्रॅश झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आल्याचं ही स्पष्ट झालं आहे.

हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला १३३ प्रवाशांना घेऊन जात होतं अशावेळीच चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला. अपघात झालेले जेट हे बोईंग ७३७ विमान होते आणि मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

Related Stories

जोतिबाचा गुलाल धुण्यासाठी लागतो पाऊस; लोक वाक्याचा भाविकांना आला प्रत्यय

Archana Banage

‘या’ ४३ जणांचा केंद्रीय मंत्रीमंडळात होणार समावेश

Archana Banage

‘वॉटर प्लस’मध्येही इंदोर अव्वल

Amit Kulkarni

लॉकडाऊनवरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेद!; राष्ट्रवादीने केला जाहीर विरोध

Tousif Mujawar

आसारामबापूंच्या आश्रमात सापडला मुलीचा मृतदेह

Patil_p

चारही महापालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसची सरशी

Patil_p