Tarun Bharat

चीनला आणखी एक धक्का; BSNL, MTNL कडून 4G टेंडर रद्द

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारताने चीनच्या 59 ॲपवर बंदी आणल्यानंतर बीएसएनएल आणि एमटीएनएलने आज 4G टेंडर रद्द करत चीनला आणखी एक धक्का दिला आहे.

चिनी कंपन्यांना दूर ठेवण्यासाठी BSNL ने  4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने आज रद्द केल्या आहेत. चीनला या टेंडरपासून दूर ठेवून, पुन्हा नव्याने येत्या दोन महिन्यात हे टेंडर काढण्यात येईल. नव्या निविदेत मेक इन इंडिया आणि भारतीय टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदी असणार आहेत.  

BSNL आणि MTNLवर सर्वाधिक चिनी उत्पादने खरेदी केल्याचा आरोप होता. त्यानंतर BSNL आणि MTNL ने  चिनी कंपन्यांकडून वस्तू खरेदी करणे टाळावे, असे निर्देेेश दूरसंचार मंत्रालयाने दिले होते. भारताच्या दूरसंचार क्षेत्राचा परदेशी उपकरणांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

Related Stories

नव्याने सुरुवात करूया!

Patil_p

सुप्रिया सुळेंचं महाविकास आघाडी सरकारसंदर्भात भाकीत; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

Abhijeet Shinde

उपराष्ट्रपती निवडणुकीचे आज मतदान-निकाल

Patil_p

पीएफआयमध्ये सिमीचे सदस्य कार्यरत

Patil_p

कोरोना : महाराष्ट्रात 3,314 नवीन रुग्ण; 66 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!