Tarun Bharat

चीनला परिणाम भोगावे लागणार : डोनाल्ड ट्रम्प

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोना विषाणूसंदर्भात चीनने प्रारंभिक माहिती लपवल्याने त्याचे जगाला परिणाम भोगावे लागत आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीनने वारंवार फसवणूक केली आहे, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा निशाना साधला. 

 व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावेळी ट्रम्प म्हणाले, कोरोना हा चिनी विषाणू असून, संपूर्ण जग चीनच्या कर्मांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगतो आहे. वेळेत माहिती दिली असती तर कोरोनाला चीनमध्येच रोखता आले असते. यााप्रकरणी अमेरिका चीनवर कारवाई करणारच आहे. ते तुम्ही पहालंच, अशी धमकीच ट्रम्प यांनी चीनला दिली.

Related Stories

नवाज शरीफ यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा

datta jadhav

पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हा भेदभाव का?

Archana Banage

दिलासा! तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

datta jadhav

आता जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्येही खरेदी करता येणार जमीन

datta jadhav

उपमुख्यमंत्र्यांच्या भ्रष्ट व्यवहारासाठी दुपारी ईडीच्या अधिकार्‍यांना भेटणार : सोमय्या

datta jadhav

मेक्सिको : 20, 548 नवे कोरोना रुग्ण; 1,539 मृत्यू

Tousif Mujawar