Tarun Bharat

चीनशी फॅशन लिंक : इटली बेजार

Advertisements

इटलीतील कोरोना विषाणूंच्या बळींची संख्या आता चीनसमीप पोहोचली आहे. तर चीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आशियात चीन तर युरोपमध्ये इटली नोवेल कोरोना विषाणूने सर्वाधिक ग्रस्त आहे. कोरोना विषाणू जगभरात फैलावला असूनही इटलीत त्याचा सर्वाधिक प्रकोप का झाला या प्रश्नाचे उत्तर इटलीच्या चीन कनेक्शनमध्ये आहे.

फॅशन उद्योगात लाखो चिनी कामगार

इटलीचा उत्तर भाग फॅशन आणि वस्त्राsद्योगाने बहरला आहे. गुची आणि प्राडा यासारखे प्रतिष्ठित जागतिक ब्रँड्स इटलीच्या उत्तर भागात एकवटले आहेत. तर चीन जगाला स्वस्त निर्मिती उपलब्ध करत असल्याने इटलीतील बहुतांश फॅशन ब्रँड्स चीनसोबत मिळून काम करत आहेत. इटलीच्या या फॅशन हाउसमध्ये स्वस्त कामगारांच्या स्वरुपात चिनी कामगारांना नेमण्यात आले असून यातील बहुतांश जण वुहानचे नागरिक आहेत.

चीनचा दबदबा

इटलीतून वुहानसाठी थेट विमानसेवा आहे. तसेच इटलीच्या वस्त्राsद्योग क्षेत्रात 1 लाखांहून अधिक चिनी नागरिक काम करतात. चिनी नागरिकांनी इटलीत स्वतःचे प्रभुत्व निर्माण केले असून आता तेथील अनेक फॅशन कंपन्यांचे मालक चिनी नागरिक आहेत. तर इटलीत सुमारे 3 लाख चिनी नागरिक असून त्यातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक जण इटलीच्या वस्त्राsद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. तेथे हजारो छोटय़ा कंपन्या असून त्यांच्याकडून निर्यात केली जाते. इटलीतील वस्त्राsद्योग क्षेत्र परस्परांशी जोडलेले aदेखली आहे.

उशिरा जाग आली

इटलीच्या प्रशासनाची कोरोना विषाणूच्या धोक्यासंबंधीची सक्रीयता फारच उशिरा दिसून आली. इटलीत आतापर्यंत 2978 जणांचा मृत्यू झाला असून 35713 रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनमध्ये बळींचा आकडा 3245 इतका आहे. नोवेल कोरोना विषाणूने  इटलीवर दोन प्रकारे हल्ले केले आहेत. एक तर तेथे मृतांची संख्या खूपच अधिक आहे. सुमारे 60 टक्के लोकसंख्या 40 किंवा त्याहून अधिक वयाची आहे. यातही 23 टक्के लोकसंख्या 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांची आहे. याच कारणामुळे देशातील एक चतुर्थांश लोकसंख्या धोक्यात सापडली आहे. तर इटलीच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा प्रतिकूल प्रभाव पडला आहे. या संकटामुळे देशातील 100 अब्ज डॉलर्सच्या फॅशन उद्योगाला फटका बसणार आहे. हा उद्योग बहुतांशपणे चीनवर अवलंबून आहे. केवळ निर्मिती नव्हे तर चीनच्या अब्जावधी ग्राहकांच्या बाजारपेठेमुळे हा फटका दुहेरी असणार आहे.­

Related Stories

तालिबानला इशारा, अफगाण नेत्यांना सल्ला

Patil_p

चीनमध्ये परतला कोरोना, शाळा बंद, लोक पुन्हा घरात कैद

Patil_p

कोरोनापेक्षा अधिक घातक असणार भविष्यातील महामारी

Patil_p

स्वीडनमध्ये धार्मिक दंगली सुरूच

Patil_p

अमेरिकेत वादळामुळे 50 जणांचा मृत्यू

Patil_p

लसीकरणात भारत, अमेरिका, चीन आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!