Tarun Bharat

चीनहून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्ये तब्बल 145 टक्के नफेखोरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनमधून आयात करण्यात आलेल्या 5 लाख रॅपिड टेस्टिंग किटमध्ये आयातदार आणि वितरकांनी तब्बल 145 टक्के नफेखोरी केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात उघड झाले.

कोरोनाचे कमी वेळात निदान व्हावे, यासाठी भारताने चीनहून 5 लाख ‘रॅपिड टेस्टिंग किट’ आयात केले होते. ‘मॅट्रिक्स लॅब्स’ या आयातदार कंपनीने या किटची आयात केवळ 245 रुपयांना केली होती. वितरकांच्या नफेखोरीमुळे हे किट भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (IMCR) 600 रुपयांना विकण्यात आले. देशावर कोरोनासारखे भीषण संकट असतानाही आयातदार ते वितरकांच्या नफेखोरीमुळे हे किट तब्बल 145 टक्के प्रत्येक किटमागे नफामिळवून विकण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाने या किटच्या कींमतीवर आक्षेप घेत किटच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

‘मॅट्रिक्स लॅब्स’ने चीनच्या ‘वोंडफो बायोटेक’कडून 5 लाख किट आयात केले होते. त्यासाठी त्यांनी 21 कोटी रुपये खर्च केले. IMCRला आत्तापर्यंत 2.76 लाख किट पुरवण्यात आले आहेत. त्याचे 12.75 कोटी मॅट्रिक्स लॅब्सला मिळाले आहेत.त्यानंतर किटमध्ये दोष आढळल्यानंतर आयएमसीआरकडून या किटचा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे उरलेली 2.24 लाख किट मॅट्रिक्स लॅबकडे पडून आहेत.

रेअर मेटाबॉलिक्स’ हा रॅपिड अँन्टीबॉडी टेस्ट किटचा भारतात एकमेव वितरक आहे. त्यांनी आयातदार ‘मॅट्रिक्स लॅब्स’विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

Related Stories

solapur; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Abhijeet Khandekar

फेरीवाल्यांचे औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात लोटांगण आंदोलन

Abhijeet Khandekar

बाधितांच्या संख्येत किंचित घट

datta jadhav

शेतकऱ्य़ांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर पुन्हा ‘मविआ’चं आंदोलन,हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

Archana Banage

Yes Bank Scam Case : अविनाश भोसले, संजय छाब्रियांवर ईडीची कारवाई ; 415 कोटींची मालमत्ता जप्त

Abhijeet Khandekar