Tarun Bharat

चीन, युरोपमध्ये कोरोना रुग्णवाढीनंतर केंद्राचा राज्यांना अलर्ट

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

चीन, युरोपमध्ये कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु नका अशी सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष देण्यास सांगितलं आहे. टेस्ट, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जाव अशी सूचना केंद्राने केली आहे.

बाहेरील देशात काही ठिकाणी कोरोनाचे नवे स्ट्रेन आढळून येत आहेत. चीन, युरोपमध्ये कोरोनाचे दिवसाला हजारो रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता देशातील आरोग्य मंत्रालयाच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र यामुळे कोणीही घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहले आहे. यात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि सोशल डिस्टन्स या पंचसुत्रीची अमंलबजावणी पुढेही चालू ठेवण्यासंदर्भात माहिती दिली आहे.

Related Stories

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

datta jadhav

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी

Abhijeet Shinde

धामोड परिसरात पूर्वकल्पना न देताच विद्युतपंप कनेक्शन तोडली

Sumit Tambekar

काँग्रेस आमदार शर्मन अली अहमद अटकेत

Patil_p

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; गाडीत पिस्तुल ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Abhijeet Shinde

खोकेबाज सरकारचे महाराष्ट्रासाठी धोके

Patil_p
error: Content is protected !!