Tarun Bharat

चीन : वुहानमधील सर्व शाळा मंगळवारपासून होणार सुरू

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

कोरोना उद्रेकाचे केंद्रबिंदू असलेले चीनमधील वुहान शहर पूर्वपदावर येत आहे. वुहानमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने तेथील सर्व शाळा आणि अंगणवाड्या येत्या मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

वुहानमध्ये जवळपास 2842 शैक्षणिक संस्था आहेत. त्यामध्ये 1.4 मिलियन विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. मात्र, मंगळवारपासून या सर्व शैक्षणिक संस्थांचे दरवाजे खुले होणार आहेत. उद्यापासून (सोमवार) वुहान विद्यापीठही सुरू होणार आहे. 

शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना रोग नियंत्रक उपकरणांचा साठा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत आणि शाळेबाहेर मास्क वापरावेत, शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत

Related Stories

अमेरिकेची लस भारताच्या कायदे कचाट्यात

datta jadhav

रशियात बाधितांची संख्या 44 लाखांवर

datta jadhav

कोरोनाची धास्ती : अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू

Tousif Mujawar

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या दिल्लीतील पत्रकारास अटक

Tousif Mujawar

धास्ती महापुराची…तयारी स्थलांतराची

Abhijeet Khandekar

पाकमध्ये आत्मघाती स्फोट; 3 सैनिक ठार

datta jadhav