Tarun Bharat

चुकीचे औषध देऊन मला संपविण्याचा कट

ऑनलाईन टीम / मुंबई :

संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना मला संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट होता. शरीरात चुकीचे औषध सोडून मला मारुन टाकण्यात येणार होते. पण कर्मचाऱ्याने आधीच मला सावध केल्याने मी जिवंत राहिलो, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी विधासभेत केला.

नितेश राणे म्हणाले, संतोष परब हल्ला प्रकरणात मला अटक झाली होती. यावेळी सावंतवाडी कारागृहात माझी प्रकृती खालावली. कणकवलीमध्ये उपचार सुरू होते. मात्र, वेदना कमी होत नसल्याने मला कोल्हापुरात हलविण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारने मला तिथेच मारण्याचा कट आखला होता. कोल्हापुरातील रुग्णालयात ॲडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी ॲन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचे सांगितलं. ही टेस्ट बळजबरी करण्यात येणार होती. पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की, साहेब सीटी ऍन्जिओ टेस्ट करू नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. कर्मचाऱ्याने वेळीच सावध केल्याने मी आज जिवंत राहिलो.

Related Stories

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Archana Banage

संचारबंदी आदेश मोडणाऱया 30 जणांवर गुन्हा

Patil_p

पुण्यात कोरोनाने दोन महिलांचा मृत्यू

prashant_c

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

datta jadhav

सातारा : शाळेत कोरोना प्रादुर्भाव झाल्यास मुख्याध्यापकांस जबाबदार धरू नये

Archana Banage

सातारकरांना नाही राहिले कोरोनाचे भय

Patil_p