Tarun Bharat

चेकनाका चुकवून चोरटी घुसखोरी सुरूच

Advertisements

अनेकजण दुचाकीने, पायी फोंडाघाटमध्ये दाखल : तीव्र नाराजी : चेकनाका हलविण्याची मागणी

तुषार नेवरेकर / फोंडाघाट:

फोंडाघाट चेकनाका चुकीच्या ठिकाणी आहे, हे वारंवार निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ाच्या सुरक्षिततेबाबत हा चेकनाका निष्काम ठरत आहे. गुरुवारी रात्री विजारपूरहून आलेल्या काही दुचाकी सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करत होत्या. त्यांना गांगोवाडीतील काही सतर्क नागरिकांनी रोखले व माघारी पाठविले. त्यामुळे चेकनाका चूकवून सिंधुदुर्गात आतापर्यंत कितीजणांनी प्रवेश केला असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फोंडाघाट येथील चेकनाक्याच्या अलिकडून कोल्हापूरच्या दिशेने एका रस्त्याने चेकनाका चुकवून थेट फोंडाघाट बाजारपेठेत येता येते. या मार्गाने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही यापूर्वी अनेकजण आले होते. मात्र, ग्रामस्थांनी काहीवेळा त्यांना रोखले होते. रस्तेही अडविले होते. तरीही या आडमार्गाने वाहतूक सुरू असण्याचे प्रकार घडले होते.

गुरुवारी रात्री 11.45 च्या सुमारास काही दुचाकीस्वार आडवाटेने सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करत होते. त्यांना गांगोवाडीतील काही सतर्क नागरिकांनी रोखले. त्या युवकांनी विसंगत उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या युवकांना ग्रामस्थांनी फोंडाघाट चेकनाक्मयावर आणले. गावातील काही प्रति÷ित नागरिक व पोलिसांसमक्ष त्यांना समज देऊन माघारी जाण्यास सांगण्यात आले. तरीही ते माघारी परतण्यास तयार नव्हते. अखेर त्यांनी माघारी जाण्यास तयार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी हे युवक पुन्हा येऊ नयेत किंवा अन्य कुणी आडमार्गाने पुन्हा सिंधुदुर्गात प्रवेश करू नये, यासाठी गांगोवाडीत मध्यरात्रीपर्यंत त्या आडरस्त्याला पहारा दिला. यात प्रमोद लाड, रुपेश चव्हाण, विलास लाड, मिलिंद लाड, बंडू सावंत, भिरंवडेकर, हर्षद सावंत, गिरिश लिंग्रस, उत्तम लाड, तुळशिदास गुरव, सतीश लाड, पिंटू लाड, मंगेश लाड, नागेश लाड, पप्पू लाड, सुशांत लाड, बाबाजी सावंत आदी उपस्थित होते.

घटनेची माहिती मिळताच फोंडाघाट माजी सरपंच व भाजपचे नेते राजन चिके तसेच संदेश पटेल, सरपंच संतोष आग्रे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा आडवाटेचा रस्ता माती टाकून बंद करत चारचाकी वाहनांना माघारी धाडण्याचे प्रयत्न केले. परंतु दुचाकीस्वारांनी आजूबाजूने वाट काढत जिल्हय़ात प्रवेश केला. तर गेले कित्येक दिवस मोठय़ा संख्येने दुचाकीस्वार याच वाटेने गावातून जिल्हय़ात प्रवेश मिळवित आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या काळात फोंडाघाट चेकनाका सुरक्षिततेच्या बाबतीत योग्य आहे का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. ही वाहतूक रोखण्यासाठी व भविष्यातील येणाऱया अडचणींना योग्यप्रकारे हाताळण्यासाठी हा चेकनाका घाट पायथ्याला हलविणे गरजेचे झाले आहे. 

Related Stories

संस्थात्मक विलगीकरणासाठी श्री मंगल कार्यालय आरक्षित

Patil_p

बांदा-शिरोडा मार्ग चिखलमय

NIKHIL_N

उद्धव ठाकरेंचा आणखी एक नेता अडचणीत, ACB कडून चौकशी

Archana Banage

चौकशीनंतरच नगरपालिका देणार ठराव

NIKHIL_N

ओटवणे चॅरीटेबल ग्रुप आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन

NIKHIL_N

भूसुरूंग लावून अनधिकृत जेटी उडवण्यास प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!