Tarun Bharat

चेकपोस्टवरील तपासणीत शिथिलता द्या

भाजप युवा मोर्चाकडून गोवा मुख्यमंत्र्यांची भेट

प्रतिनिधी / बांदा:

महाराष्ट्र-गोवा सीमेवरील चेकपोस्टवर गोव्यातील पोलिसांकडून केल्या जाणाऱया कडक तपासणीबाबत भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱयांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्गातील वाहनांना गोव्यात प्रवेश करताना तपासणीत शिथिलता देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री सावंत यांनी तातडीने उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षकांना सिंधुदुर्गातील वाहनांना शिथिलता देण्याचे निर्देश दिले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत व युवा मोर्चा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी गोव्यात रोजगारासाठी जाणाऱया नोकरदारांची व्यथा मांडली. पत्रादेवी, दोडामार्ग, सातार्डा व आरोंदा चेकपोस्टवरून गोव्यात जाणाऱया वाहनांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याने नोकरदार वर्गाचे अतोनात हाल होत आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. पेडणे तालुक्यातील बहुतांश गावे बांदा बाजारपेठेशी संलग्न असल्याने बाजारपेठेवर विपरित परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. गाळेल येथील दरडीत मृत झालेला युवक हा तपासणी नाक्यावरील कडक अंमलबजावणीचा बळी होता, याकडेही लक्ष वेधले.

                     हायकोर्टाच्या निदर्शनास आणणार

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षकांना सिंधुदुर्गातील वाहनांना चेकपोस्टवर तपासणीत शिथिलता देण्याचे आदेश दिले. सदर बाब हायकोर्टात प्रलंबित आहे. गाळेल येथील दुर्घटनेचा पंचनामा व तुमचे निवेदन हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस, सरचिटणीस मधुकर देसाई, कार्यकारिणी सदस्य विनेश गवस, साई धारगळकर, शहर अध्यक्ष साई सावंत उपस्थित होते.

Related Stories

१५८ उमेदवारांची निवडणूकीतून माघार

Archana Banage

‘जादुगार जितेंद्र रघुवीर सादर करणार नवीन जादूचे प्रयोग ’

Patil_p

रत्नागिरी : हातपाटी वाळूबाबत लवकरच धोरण ठरवणार!

Archana Banage

‘गोमय’ चळवळीवर बाप्पांची कृपा

NIKHIL_N

पोलीस व्हॅन चालक रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह

Anuja Kudatarkar

कारवाईनंतरही मालवण, वेंगुर्लेत एलईडीचा धुमाकूळ

NIKHIL_N