Tarun Bharat

चेन्नई संघातील एका सदस्याला कोरोनाची लागण

Advertisements

वृत्तसंस्था/ वेन्नई

9 एप्रिलपासून 14 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मुंबईत प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या बलाढय़ चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेचे सावट पसरले आहे.

शनिवारी या संघातील सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत या संघाचा एक सदस्य पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. दरम्यान सदर कोरोना बाधित सदस्य या संघातील खेळाडू किंवा प्रशिक्षक वर्गातील नसल्याचे विश्वनीय गोटातून सांगण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा या स्पर्धेतील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर 10 एप्रिल रोजी होणार आहे.

गेल्यावर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवेळी चेन्नई संघातील दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड हे दोन खेळाडू कोरोना बाधित ठरले होते. 10 ते 25 एप्रिल दरम्यान वानखेडे स्टेडियमवर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 10 सामने खेळविले जाणार आहेत त्यापैकी चेन्नई संघाच्या पाच सामन्यांचा समावेश आहे.

Related Stories

भगत, धिल्लॉ यांना पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदके

Patil_p

खरशियाचा रुबलेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पाकच्या स्थानिक क्रिकेटपटूंच्या वेतनामध्ये वाढ

Patil_p

कॅगिसो रबाडा चौथ्या कसोटीतून निलंबित

Patil_p

आयर्लंड संघाचा मोसमातील पहिला विजय

Patil_p

मुंबई-पंजाब आज आमनेसामने, फलंदाजांची जुगलबंदी अपेक्षित

Omkar B
error: Content is protected !!