Tarun Bharat

चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघा जणांना अटक

Advertisements

 प्रतिनिधी / बेळगाव

पल्सर मोटार सायकलवरुन येवून एका महिलेच्या गळय़ातील मंगळसुत्र पळविणाऱया दोघा जणांना मुडलगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.

अमित रामदास सिद्रामगोळ (वय 20, रा. मदरखंडी, ता. जमखंडी), आनंद कमलव्वा मेत्रे (वय 23, रा. मारापूर, ता. रबकवी-बनहट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. मुडलगीचे मंडल पोलीस निरीक्षक व्ही. एस. मुरनाळ, पोलीस उपनिरीक्षक एम. एन. सिंदूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

13 सप्टेंबर रोजी सायंकाळी मुगळखोड (ता. रायबाग) येथील राजश्री रमेश बेनचीनमर्डी या आपल्या पतीसमवेत मोटार सायकलवरुन मुगळखोडहून मुडलगी मार्गे मसगुप्पीला जात होत्या. त्यावेळी धर्मट्टी नजीकच्या मोटबसवण्णा मंदिराजवळ पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा जणांनी सव्वा लाख रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून घेवून पलायन केले होते.

या संबंधी मुडलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर सात दिवसांत अमित व आनंद या जोडगोळीला अटक करुन त्यांच्याजवळून मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे. गुह्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे 70 हजार रुपये किंमतीची पल्सर मोटार सायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.

Related Stories

कॅन्टोन्मेंट परिसर पुन्हा अंधारात

Omkar B

ऑक्सिजन सिलिंडर्स टंचाईचा तिढा कायम

Amit Kulkarni

अंकुश केसरकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा

Amit Kulkarni

दिवाळीत कोरोनाकडे दुर्लक्ष नको

Patil_p

डीसीसी बँकेच्या कर्मचाऱयांना कोरोना लसीकरण

Amit Kulkarni

चन्नम्मा सर्कलमध्ये वाहतुकीची कोंडी

Patil_p
error: Content is protected !!