Tarun Bharat

चेर्नोबिल परिसरातून रशियाची माघार

युक्रेनमध्ये असणाऱया रशियाच्या चेर्नोबिल अणुभट्टीतून उत्सर्जक पदार्थांची गळती सुरु झाल्याने तेथे असलेल्या रशियन सैनिकांनी माघार घेण्यास प्रारंभ केला आहे. या अणुभट्टीवर रशियाने युद्धाच्या दुसऱया आठवडय़ात हल्ला केला होता. त्यामुळे या अणुवीज निर्मिती केंद्राला आग लागली होती. तेथील सर्व नागरीकांना सुरक्षित रित्या बाहेर जाण्याची सूचना करण्यात आलेली होती.

आता रशियाच्या सैनिकांना या परिसरात राहणे अडचणींचे झाले आहे. किरणोत्सारी पदार्थांची गळती सुरु झाल्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी येथून रशियन सैनिक आणि सामान्य नागरीक यांनी पलायन सुरु केले आहे. किरणोत्सारी पदार्थांमुळे सैनिकांना आपली काळजी असून ते या किरणोत्सारी पदार्थांपासून जास्तीत जास्त दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. युक्रेनच्या सैनिकांना जे शक्य झालेले नाही, ते चेर्नोबिलच्या अणुगळतीने करुन दाखविले अशी प्रतिक्रिया उमटत असून सोशल मिडीयावरही या प्रकारासंबंधी बऱयाच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

चेर्नोबिलच्या भट्टीला आग लागल्याने ही गळती निर्माण झाली. यावेळी या अणुकेंद्रात संपृक्त युरेनियमचा छोटा साठा होता. तो या आगीतून वाचल्यामुळे मोठाच अनर्थ टळला होता, अशीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

Related Stories

चीनने सत्य दडविल्याने जगात महामारी

Patil_p

येथे कार करत नाहीत लॉक

Patil_p

कोरोनाचा समूळ नाश होणे अशक्य : WHO

datta jadhav

‘ट्रम्प हट्ट’: अमेरिकेची सुरक्षा धोक्यात

Omkar B

रिक्षा चालवून ऑफिसला जातात अमेरिकन डिप्लोमॅट

Patil_p

बलूचांच्या हल्ल्यांमुळे घाबरले चीन-पाकिस्तान

Patil_p