Tarun Bharat

चेल्सी क्लब अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ लंडन

प्रँक लँपर्डच्या चेल्सी एफसी संघाने एफए चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य सामन्यात चेल्सीने मँचेस्टर युनायटेडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. आता या स्पर्धेत चेल्सी आणि अर्सेनल यांच्यात 1 ऑगस्ट रोजी अंतिम सामना खेळविला जाणार आहे. चेल्सीने 2018 साली एफए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामात मँचेस्टर युनायटेडने तीनवेळा चेल्सीचा पराभव केला होता. चेल्सीतर्फे स्पेनच्या गिरॉडने पूर्वार्धात खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात मॅसन माऊंटने चेल्सीचा दुसरा गोल केला. मँचेस्टर युनाटेडच्या हॅरी मेगुरेने आपल्याच गोलपोस्टमध्ये गोल नोंदवून चेल्सीला बोनस गोल बहाल केला.

Related Stories

विंडीजचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड मरे कालवश

Patil_p

ऍश्ले बार्टी यंदाची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सम्राज्ञी

Patil_p

गुजरातचे पदकविजेते होणार मालामाल!

Patil_p

पंत-श्रेयस यांच्यात आजच्या सामन्यात चुरस

Patil_p

आघाडीच्या स्थानासाठी आज चेन्नई-दिल्ली लढत

Patil_p

अँजेलिक केर्बरची दुखापतीमुळे माघार

Patil_p